शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
उणे 40% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
3
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
4
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
5
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
6
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
7
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
8
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
9
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
10
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
11
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
12
Makar Sankranti 2026: किंक्रांत म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हा दिवस खरंच अशुभ असतो का?
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
14
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
15
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
16
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
17
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
18
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
19
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
20
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ल्याचा शिवराष्ट्र सेनेतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST

अहमदनगर : शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ...

अहमदनगर : शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेरमध्ये पोलिसांवर काही जमावाने अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला आहे. पोलीस कोरोनाच्या संकटकाळात देवदूताची भूमिका बजावत आहेत. मंत्र्यांच्याच तालुक्यात पोलिसांवर हल्ले होणे शरमेची बाब आहे. जे पोलीस आपल्या कुटुंबापासून लांब राहून कोरोना महामारीत इतर कुटुंबीयांच्या रक्षणासाठी झटत आहेत. कोरोनाने अनेक पोलीस बाधित झाले आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, लोकप्रतिनिधी असलेल्या थोरात कुटुंबीयांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पोलिसांची जाहीर माफी मागावी.

-

फोटो-०८ शिवराष्ट्र सेना