शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांनीही आणली होती  शिर्डीच्या रामनवमी उत्सवावर बंदी, ७९ वर्षांपूर्वीचा निर्णय : १९४१ला आली होती कॉलराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:31 IST

शिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता 

प्रमोद आहेर । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता यात्रेवर बंदी आणली होती. या घटनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उजाळा मिळाला आहे़  १९४१ साली ५ ते ७ एप्रिल रामनवमी यात्रा होती़ यावेळी शिर्डीसह आसपासच्या गावात कॉलराची साथ असल्याने सरकारने यात्रा बंद ठेवण्याचा हुकूम काढला़ कुस्त्यांचा हंगामा, शोभेची दारू फोडणे यासह गर्दी होईल व रोगाचा फैलाव होईल असे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. यात्रेत एकही दुकान येऊ दिले नाही. कोपरगावला गोदावरीचे पाणीही दूषित असल्याने कावड मिरवणूकही बंद ठेवण्यात आली होती. ४ एप्रिलनंतर आलेल्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीत प्रवेश दिला नाही़ दूरदूरून आलेले लोक पोलिसांच्या हुकुमाने परत गेले़ जे लोक यात्रेच्या अगोदर आले होते त्यांना कॉलराचे इंजेक्शन दिले गेले. त्यांना १३ एप्रिल पर्यंत शिर्डीत ठेवून घेतले़ दर्शनाला तरी परवानगी द्यावी, म्हणून तात्या कोते व सुखटणकर हे नगरला जाऊन जिल्हाधिकारी बहादूर यांना भेटले. पाच ताराही केल्या. पण उपयोग झाला नाही़उत्सवात कीर्तन, भजन, अभिषेक कार्यक्रम अल्प प्रमाणात करण्यात आले़ पाच दिवसांचा उत्सव होता. सरकारच्या हुकूमाने तीन दिवसांचा रद्द झाला. उर्वरित दोन दिवस सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारच्या हुकुमाला अनुसरून बंद करावे लागले़ उत्सवात स्थानिकांना भोजनाऐवजी कोरडा शिधा देण्यात आला़ याच पार्श्वभूमीवर शिर्डीला येतांना भाविकांनी मच्छरदाणी आणण्याचे आवाहन २३ जून १९४१ रोजी संस्थानकडून करण्यात आले होते़ शिर्डी गॅझेटिअरमध्ये याबाबत सविस्तर नोंदी आहेत़