शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी : सेनेलाच आघाडी, विखेंचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:32 IST

shirdi Lok Sabha Election Results 2019

दिलीप चोखरशिर्डी :पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने देशात पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना यावेळी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांचे बळ मिळाल्याने पुन्हा एकदा शिर्डी मतदारसंघातून आघाडी मिळाली.शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांचेच सातत्याने वर्चस्व राहिले आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत इतर तालुक्याच्या तुलनेने शिर्डी विधानसभा क्षेत्रातून सर्वात कमी आठ ते नऊ हजाराचे मताधिक्य शिवसेनेला मिळाले होते. २०१९ या निवडणुकीत कोण माजी मारील? अशी संभ्रमावस्था असताना ऐनवेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे याचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांनी ऐनवेळेस काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला.अहमदनगरसह शिर्डीची शिवसेनेची जागा निवडून आणण्याचा शब्द त्यांनी दिला. शेवटपर्यंत संभ्रमावस्था असताना शेवटच्या टप्प्यात शिर्डीत सेना उमेदवार लोखंडे यांना विखे यांचे पाठबळ मिळाले. यामुळे शिर्डीतून लोखंडे यांना ६२ हजार ८७१ मताधिक्य मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डीमधून संजय सुखधान यांना मैदानात उतरवले. त्याचा फटका काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना बसला. त्यांनी शिर्डीत १३ हजार ६७७ मते घेतली. कांबळे यांना ४० हजार ८९० मते मिळाली. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना केवळ ४ हजार ४७७ मते मिळाली. त्यांचा शिर्डीत काहीही प्रभाव दिसला नाही. विखे यांनी सेनेला मदत केल्याने मताधिक्य वाढले आहे. विधानसभेचा याचा विखेंना फायदा होईल.नगर, शिर्डीतील विजयाने विखेंची ताकद वाढलीशिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे राजकीय पक्षांपेक्षा विखे यांचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे. ज्या पक्षात विखे तो पक्ष विजयी होतो असे या मतदारसंघाचे समीकरण आहे. या मतदारसंघात विखे यांचा मतदारसंघातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क आहे. शिवाय विखे पाटील यांनी अहमदनगर व शिर्डी या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्याने त्यांची वैयक्तिक ताकद मतदारसंघात वाढल्याने याचा फायदा त्यांना विधानसभेलाही होणार हे नक्की.की फॅक्टर काय ठरला?विखे हे भाजपसोबत असल्याने कोणत्याही परिस्थितीत सेनेला मताधिक्य मिळविण्यासाठी विखे यांनी प्रयत्न केले.भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सेना-भाजपच्या मतांना फारसा धक्का पोहोचला नाही.निळवंडे लाभक्षेत्रातील गावांनी लोखंडे यांना जोरदार साथ दिली. तेथे कांबळे यांचा प्रभाव जाणवला नाही.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी