शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शंकराचार्यांच्या वक्तव्याने शिर्डी संतप्त

By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्याच्या घेतलेल्या आक्षेपावर सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली.

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्याच्या घेतलेल्या आक्षेपावर सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली. शिवसेनेने विधान मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.साईबाबांच्या हयातीत अब्दुल बाबा, बडे बाबा, अमीर शक्कर, जव्हार अली, सिद्दी फाळके सारखे हज यात्रा केलेले मुस्लीम साईभक्त होते़ साईबाबांनी शंभर वर्षापूर्वी रामनवमी व उरुस एकाच दिवशी करण्याची प्रथा सुरू केली़ आजही रामनवमीच्या दिवशी मुस्लीम बांधव संदलची मिरवणूक काढतात़ मुख्य म्हणजे रोज सकाळी दहा वाजता सार्इंच्या समाधीवर अब्दुल बाबांचे वंशज फुले वाहतात़ द्वारकामाईत मज्जीदमध्ये बाबांनी आपली हयात घालवली. तेथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून केशरी व हिरवा ध्वज लावण्यात येतो़ असे असतानाही शंकराचार्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे शिर्डीकर व साईभक्त व्यथित झाले़आम्ही साईबाबांचा सदैव आदर करतो, बाबा मोठे संत असून ते हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असल्याचे मत येथील मौलाना असगरअली यांनी व्यक्त केले़ मानव धर्माचा उपदेश करणाऱ्या साईबाबांची सबका मालिक एक ही शिकवणच आज देश एकसंध ठेवण्यास व जातीय सलोखा राखण्यासाठी महत्वाची असल्याचे सांगत संस्थानचे माजी प्रशासकीय अधिकारी सुभाष जगताप यांनी ‘राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक, मग भक्तीच धरावी का अटक, वर्तावे तुटक किमर्थ, काय तुम्ही लेकरे मुढ, बांधा हिंदू-अविधांची सांगड, व्हा दृढ सुविचारा रूढ, तरीच पैलथडी पावाल़’ या साईसच्चरित्रातील ओवीचा संदर्भ दिला़शंकराचार्यांनी साईसच्चरित्राचा अभ्यास करावा व मगच विधान करावे, अशा बेताल वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होऊ शकते, शंकराचार्यांनी आपले विधान मागे घेतले नाही तर शिर्डीकर व साईभक्तांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, नितीन कोते आदींनी दिला़ सिंगापूर येथील भाविक प्रतीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बाबांविषयी कोणीही काहीही वक्तव्य केले तरी आमच्या श्रद्धेत फरक पडणार नाही. बाबांची मूर्ती पाहिल्यावर जो आत्मिक आनंद आम्हाला मिळतो तो शब्दात सांगणे कठीण आहे़ यामुळेच आमची बाबांवर नितांत श्रद्धा आहे़(वार्ताहर) पुतळ्याचे दहनद्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले़ साईबाबांचे समकालीन भक्त तात्या कोते यांचे वंशज निलेश कोते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी शंकराचार्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला़ काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला़साईबाबा थोतांड आहेत, तसेच शिर्डीत मुस्लीम येत नसल्याने साईबाबा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक नसल्याचे वक्तव्य शंकराचार्यांनी केले होते़ यामुळे शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया उमटली़ निलेश कोते यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड महार्गावर संस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शंकराचार्यांचा पुतळा जाळण्यात आला़ कोते म्हणाले की, बेताल आरोप करणारा हा फॅसिस्ट माणूस आहे, हायप्रोफाईल असलेला हा माणूस ए़सी़ मध्ये फिरतो, बाबांचे तसे नव्हते. ते शिर्डीत फकीर म्हणून राहिले. त्यांच्यावर करोडो भाविकांची श्रद्धा आहे़ पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. हे सर्वधर्म समभावाचे ठिकाण आहे़ साठ वर्षे बाबांनी येथे एका पडक्या मस्जीदमध्ये वास्तव्य केले़ लाखो भाविकांची बाबांवर निस्सीम श्रद्धा आहे़ संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करून श्रद्धेला तडा देण्याचे काम कुणीही करु नये. बाबांच्या जीवनावर आधारित साईसच्चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय बाबांचे महत्व कळणार नाही.-जयंत ससाणे, संस्थानचे माजी अध्यक्ष.