शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी विमानतळचे उद्घाटन काकडीकरांनी पाहिले दुरून; विमानतळाच्या दारातच प्रशासनाने अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 16:09 IST

ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन शिर्डी विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कअस्तगाव : शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी १० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. परंतु ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.काकडी गावातील सुमारे ७६४ शेतकरी खातेदारांच्या जमिनी विमानतळात गेल्या आहेत. विमानतळात जमीन गेलेल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला विमानतळात नोकरी दिली जाईल, असे आश्वासन विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यात झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. आंदोलने, उपोषणे झाली. परंतु अजूनही या गावातील थोडक्याच नागरिकांना नोकºया मिळाल्या आहेत. तर अनेक नागरिक अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना नोक-या मिळाल्या त्यांनाही कनिष्ठ दर्जाचे काम मिळाल्यामुळे विमानतळात घेतलेले कामगारही निराश आहेत. तसेच काकडी गावच्या सरपंच नानुबाई विनायक सोनवणे यांनाच कसेबसे उद्घाटनादरम्यान आत सोडण्यात आले. गावातील काही ठराविक नागरिकांना पास दिले असतानाही आत सोडण्यात आले नाही. काकडी गावातील अनेक नागरिकांना पास दिले नाहीत, पण मुख्य प्रवेशद्वाराशेजारीही फिरकू दिले नाही. आपल्याच शेतात येऊन आपल्यावर विमान प्राधिकरणाने गाजवलेला अधिकार नागरिकांनी अनुभवला. राष्ट्रपतींचा ताफा शिर्डीच्या दिशेने गेल्यानंतर आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना हुसकून लावले. त्यामुळे काकडी गाव अस्वस्थ होते.

विमानतळ उद्घाटनादरम्यान काकडी गावातील कुणालाही आत सोडण्यात आले नाही. फक्त मला सोडण्यात आले. उद्घाटन होऊन गेले आता काय करणार. भूमिपूजनानंतर आठ वर्षे होऊन गेले गाव एकत्र राहिले नाही. आता आपले काय चालणार. राष्ट्रपतींसोबत बोलण्यास परवानगी मिळाली नाही. जमिनी जाऊन काही फायदा गावाला झाला नाही.-नानुबाई विनायक सोनवणे, सरपंच, काकडी.