शेवगाव : शहरातील बाजारपेठेतील चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह विविध वस्तू लुटल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे झाली.शेवगाव शहरातील गजबजलेल्या भागातील दुकानांमध्ये धाडसी चोरी झाल्यामुळे शेवगावमधील व्यापा-यांमध्ये घबराट पसरली आहे. दूरसंचार केंद्राजवळ प्रणव कम्युनिकेशन, श्रीराज मोबाईल दुकाने आहे. या दुकानांमधून रोख रक्कम तसेच मोबाईलसह इतर एक्सेसरीज चोरट्यांनी लांबविल्या. त्यानंतर चोरट्यांनी पंचायत समिती रोडवरील साई मेडिकलवर डला मारला़ मेडीकलमधील रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मुख्य पेठेतील लोहिया किराणा हे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह विविध वस्तूंवर हात साफ केला. यापैकी काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही होते. या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
शेवगावात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:54 IST