शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावच्या आठवडे बाजाराचे लवकरच स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

शेवगाव : ‘जागेअभावी शेवगावचा आठवडे बाजार रस्त्यावर’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आठवडे ...

शेवगाव : ‘जागेअभावी शेवगावचा आठवडे बाजार रस्त्यावर’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आठवडे बाजार स्थलांतर विषयी बुधवारी ( दि.१० ) रोजी नगरपरिषद कार्यालयात दुपारी बारा वाजता अधिकारी व देवस्थानचे विश्वस्त यांच्यात बैठक पार पडली आहे.

आठवडे बाजार नवीन जागेवर खंडोबामाळ येथे पुढील महिन्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन बनसोडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष छबूराव मिसाळ यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टच्या अटी शर्तींवर चर्चा होऊन प्रशासन व देवस्थान विश्वस्त यांच्यात एकमत होऊन देवस्थानच्या मालकीची जागा आठवडे बाजारासाठी देण्याचे ठरले आहे. याबाबत लवकरच लेखी करार होऊन नंतर पुढील महिन्यात आठवडे बाजाराचे स्थलांतर होणार आहे.

शेवगाव येथील आठवडे बाजार शहराच्या मध्यवस्तीत बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर इनामदार यांच्या खासगी जागेत भरतो आहे. बाजारासाठी सदरची जागा अपुरी पडू लागल्याने व्यापाऱ्यांनी थेट नेवासा रस्ता, मिरी रस्त्यावरच शेतमाल विक्री करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ती दुकाने रहदारीला मोठा अडथळा ठरत आहेत. तसेच अवघ्या काही अंतरावर बसस्थानक असल्याने स्थानकात मंडळाच्या येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या दिवस भरातील ४५० फेऱ्या, नेवासा, नगर, मिरी, पैठण, पाथर्डीकडे जाणारी वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होते आहे. यावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पुढील महिन्यात आठवडे बाजार खंडोबामाळ येथे भरणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सुटणार असून बाजारात माल विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर अन्य तालुक्यातील येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढणार आहे.