शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेवंती सुकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:46 IST

शेवंतीच्या फुलांना दसरा दिवाळीत चांगला भाव येतो. शेवंतीची लागवड केली तर घरात दोन पैसे येतील असा विचार करून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकरी मारूती काशिनाथ साठे यांनी ८० हजार खर्च करून फुल शेती केली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला . सारी शेवंती सुकून गेली.

योगेश गुंडकेडगाव : शेवंतीच्या फुलांना दसरा दिवाळीत चांगला भाव येतो. शेवंतीची लागवड केली तर घरात दोन पैसे येतील असा विचार करून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकरी मारूती काशिनाथ साठे यांनी ८० हजार खर्च करून फुल शेती केली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला . सारी शेवंती सुकून गेली.कामरगाव येथील शेतकरी मारूती साठे यांनी एक एकरात शेवंतीची लागवड केली. त्यासाठी ठिबकद्वारे पाणी देण्याची सोय केली. महागडे बी बियाणे आणले. खुरपणी खर्च, दजेर्दार खते वापरली. विहीरीला व बोअरला थोडेफार पाणी होते. शेवंतीची लागवड करताना रानटी सस्यापासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या चारही बाजुंनी तारेचे कूंपन केले. या सर्वासाठी तब्बल ८० हजार रुपये खर्च केले.मोसमी पाऊस तर आलाच नाही. आता सगळी मदार परतीच्या पावसावर होती. दिड महिना परतीच्या पावसाची वाट पाहण्यातच गेला. मात्र पाऊस काही आलाच नाही. विहिरीचे पाणी आटले, कूपनलिकेला पाणी नाही. शेंवती फुलू लागली, मात्र शेवटचा पाण्याचा ढोस देण्याआधीच नेमके उपलब्ध असलेले पाणी आटले .टँकरने पाणी द्यायचे तर ते परवडणारे नाही .एका टँकर ला १७०० रुपये खर्च लागतो. टँकरने पाणी दिले असते तर किमान २० ते २५ टँकर लागले असते. त्यात आता बाजार भाव ही नाही. हाता तोंडाशी आलेला घास पाण्याअभावी निघुन गेला. दोन मुले व सारे कुटुंब शेतीवरच अवलंबुन आहेत. मोठा खर्च करून केलेली फूलशेती पाण्याअभावी सुकून गेली. त्यात फुलांना चांगले भावही नाह. यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे .आमच्या भागात झेंडू शेवंतीची लागवड अलिकडच्या काळात वाढत आहे. म्हणुन आम्हीही खर्च करून शेवंतीची लागवड केली. सुरूवातीला पाणी होते पण अखेरच्या टप्प्यात पाऊस न झाल्याने पाणी कमी पडल. परिणामी फुले सुकून गेली .- मारूती साठे, शेतकरी, कामरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर