शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हत्याकांडातील चौकशीनंतर शेळके याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अडीच वर्षांपूर्वी शहर सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात शेळके याच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ...

अडीच वर्षांपूर्वी शहर सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात शेळके याच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके फरार होता. दरम्यान, जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा पोलीस गेल्या २४ दिवसांपासून शोध घेत आहेत. बोठे हा शेळके याच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पुणे येथे बोठे याचा शोध घेतला. बोठे सापडला नाही, मात्र शेळके सापडला. त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी शेळके याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शेळकेच्या वतीने ॲड. महेश तवले यांनी काम पाहिले. शेळकेने शहर सहकारी बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेताना कसा अपहार केला, या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे. याच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती गडकरी यांनी केली होती.

दोषारोपपत्र कधी दाखल होणार

शहर सहकारी बँकेतील १७ कोटी २५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात डॉ. नीलेश शेळके याच्यासह बँकेतील अधिकारी व संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन अडीच वर्षे लोटले आहेत, तरी याप्रकरणी अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. फॅारेन्सिक ऑडिट बाकी असल्याने दोषारोपपत्र दाखल करता येत नसल्याचे तपासी अधिकारी सांगत आहेत. मात्र, हे फॅारेन्सिक ऑडिट कधी पूर्ण होणार, हाच मोठा प्रश्न आहे.