शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

‘तिने’ भोगल्या जीवंतपणी मरणयातना

By admin | Updated: July 19, 2024 13:07 IST

पारनेर : खासगी डॉक्टरच्या चुकीच्या निष्कर्षामुळे एका गरोदर महिलेला जीवंतपणी मरतयातना भोगण्याची वेळ आली़

पारनेर : खासगी डॉक्टरच्या चुकीच्या निष्कर्षामुळे एका गरोदर महिलेला जीवंतपणी मरतयातना भोगण्याची वेळ आली़ नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर खासगी डॉक्टरकडे तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चक्क तुम्ही एचआयव्ही बाधित असल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला़ हा अहवाल पाहून महिलेसह नातेवाईकांच्या काळजाचे ठोके चुकले़ प्रसूतिकाळ जवळ आल्यानंतर या महिलेला कोणी रुग्णालयातही दाखल करून घेईना़ बाळंत झाल्यानंतरही नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचीही परवड सुरू झाली़ शेवटी एचआयव्ही नसल्याचा शासकीय रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ तालुक्यातील एक गरोदर महिला अळकुटी मार्गावर असलेल्या खासगी रुग्णालयात नियमित उपचार घेत होती़ दोन दिवसांपूर्वी नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूतिबाबत तपासणी करण्यासाठी सदर महिला त्या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली़ यावेळी डॉक्टरने सदर महिलेच्या रक्ताचे नमुने घेतले़ हे नमुने एका पॅथॉलॉजी लॅबकडे पाठविले़त्यांनी सदर महिलेला चक्क एचआयव्हीची लागण असल्याचा अहवाल दिला़ हा अहवाल पाहून डॉक्टरने त्या महिलेला बेल्हे रस्त्यावरील एका शासकीय रूग्णालयात पाठविले. मात्र, तिच्या जवळ असलेला एचआयव्ही बाधितचा अहवाल तिला मरणयातना देणारा ठरला़ हा अहवाल पाहून त्या रुग्णालयात महिलेला दाखल करून घेतले नाही़ नंतर या महिलेला पारनेर येथील एका रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे या महिलेला दाखल करून घेण्यात आले़ प्रसूतिनंतर बाळाला एचआयव्हीची बाधा होऊ नये म्हणून एक इंजेक्शन द्यावे लागते़ महिलेच्या नातेवाईकांनी रात्रभर धावपळ करून औरंगाबाद येथून हे इंजेक्शन आणले़ या रुग्णालयात या महिलेने एका मुलीला जन्म दिला़ मात्र, एचआयव्हीचा अहवाल पाहून त्या बाळाला कोणी हातातही घेईना़ मात्र, पुर्नतपासणी अहवालात या महिलेला एचआयव्ही नसल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला़ (तालुका प्रतिनिधी)