शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कामगार लढ्याचा वाटाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:09 IST

रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली व त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला. त्यात वयाच्या दहाव्या वर्षापासून कॉ. एकनाथराव भागवत सहभागी झाले होते. 

अहमदनगर : कॉ. एकनाथराव भागवतांचा जन्म ४ सप्टेंबर १९०८ रोजी देवास (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी़ ते शेवगाव तालुक्यातील एरंडगावचे़ मात्र, त्यांचा जन्म आजोळी देवास येथे झाला़ ते अवघे दहा-अकरा वर्षाचे असतानाच रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली. यामध्ये कॉ. चंद्रभान आठरे पाटील, कॉ. अप्पासाहेब शिंदे, कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. विनायकराव ताकटे, कॉ. अचपलराव लांडे पाटील, कॉ. धर्मा भांगरे, कॉ. ठाकोरभाई आदी विविध जाती-जमातीतील तरुणांचा समावेश होता. त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला.‘नया जमाना आयेगा, कमानेवाला खायेगा’ असा जयघोष करत कम्युनिस्टांनी सावकारशाहीविरोधात संघर्ष सुरू केला. सावकारांनी दडपशाहीने घशात घातलेल्या जमिनी शेतकºयांनी परत घेतल्या. हा सावकारशाहीविरोधी लढा चालू असतानाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण हैद्राबाद संस्थान मात्र निजामाच्याच ताब्यात होते. निजामाचे रझाकार हैद्राबाद संस्थानाबरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातही त्रास देत. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हैद्राबाद स्टेट काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर अनेक छावण्या उभ्या केल्या. या लढ्यात कॉ. एकनाथराव भागवत आणि त्यांचे सहकारी अग्रभागी होते.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले सर्व प्रश्न सुटतील असे अनेकांना वाटत होते. पण गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. हे काळे इंग्रज पूर्वीसारखेच शेतकºयांकडून सक्तीने धान्याची लेव्ही वसूल करू लागले. या विरोधात कम्युनिस्टांनी संघर्ष उभारला. त्या संघर्षाचे एक केंद्र एरंडगाव होते. कारण एरंडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातून जमा केलेले धान्य एरंडगावच्या सरकारी गोदामात ठेवण्यात आले होते. हे धान्य जबरदस्तीने हलविण्याचे सरकारने ठरविले. पण या गोदामाभोवती हजारो शेतकºयांनी कॉ. एकनाथराव भागवतांच्या नेतृत्वाखाली वेढा घातला होता. सरतेशेवटी सरकारने पोलिसांच्या मदतीने हा धान्यसाठा हलवायचा निर्णय घेतला. नि:शस्त्र जनता आणि सशस्त्र पोलीस यांच्यात घमासान युद्ध झाले. यामध्ये सात शेतकरी शहीद झाले. २४ मार्च १९४९ रोजी झालेला हा पोलीस गोळीबार स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला पोलीस गोळीबार होता. जनतेतून निवडून आलेले सरकार जनतेवर गोळीबार करू शकते, त्यांचा जीव घेऊ शकते, हे भयंकर होते. यामुळे सगळीकडे सरकारची बेअब्रू झाली. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. परिणामी सक्तीची लेव्ही वसुली बंद झाली. या लढ्यात कॉ. एकनाथरावांसोबत त्यांच्या जीवनसाथी कॉ. वत्सलाताई देखील होत्या. तात्पर्य कॉ. एकनाथरावांनी कम्युनिस्ट विचार आपल्या घरापर्यंत नेला होता. तसेच नि:शस्त्र असलेली जनता सर्वशक्तिमान सरकारला वाकवू शकते, हे या घटनेने सिद्ध केले.महाराष्टÑाबद्दल आकस असलेल्या केंद्र सरकारने गुजराती भांडवलदारांच्या दबावाखाली मुंबईसह संयुक्त महाराष्टÑाला विरोध केला. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची ’ असे म्हणत सामान्य मराठी माणसाची टर उडवली. या विरोधात संयुक्त महाराष्टÑ समितीच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी रान उठवले. अहमदनगर जिल्ह्यात या लढ्याच्या नेतृत्वस्थानी कॉ. एकनाथराव भागवत आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष होता. या पार्श्वभूमीवर १९५७ च्या निवडणुका झाल्या आणि याच अहमदनगर जिल्ह्याने सर्वसाधारण जागेवर अ‍ॅड. बी. सी. कांबळे या दलित उमेदवाराला निवडून दिले. या निवडणुकीत शेवगाव मतदारसंघातून कॉ. एकनाथराव भागवतही आमदार म्हणून निवडून आले. ते आमदार असूनही साध्या एसटी बसने प्रवास करीत. एकदा करंजी येथे एसटी बस थांबली असता ते भेळ खाण्यासाठी उतरले. त्यांनी भेळ घेतली आणि खाण्यास सुरुवात करणार तोच कंडक्टरने डबल बेल दिली. दुकानदार व इतरांनी त्यांना निवांतपणे भेळ खा असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला आणि भेळेचा पुडा हातात घेऊन ते एसटीत येऊन बसले. माझ्यामुळे लोकांची गैरसोय होता कामा नये. ही त्यांची भूमिका होती. कॉ. एकनाथराव भागवत महाराष्टÑाच्या कम्युनिस्ट पक्षाचे तेरा वर्ष सेक्रेटरी होते. शेती आणि शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी जसे शेतकºयांचे लढे लढवले तसे विद्यार्थी आंदोलनालाही पाठबळ दिले. १९७२-७३ च्या दुष्काळात मॅट्रीकचे विद्यार्थी परीक्षा फी भरू शकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर कॉ. भागवतांनी शेख शमा हाजी कादर, मारूती डमाळ, अरुण लांडे आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून फी माफीसाठी विद्यार्थ्यांना पहिला मोर्चा काढायला लावला. सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेज हे भरमसाठ कॅपिटेशन फी घेऊन चालविले जात होते. या विरोधात १९७२ च्या जून महिन्यात विद्यार्थ्यांना दिशा दिली. कम्युनिस्ट पक्षातर्फे सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली. सोलापूर बाहेरील आणि वैद्यकीय क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन करण्यात आले. सरतेशेवटी सरकारला मेडिकल कॉलेज ताब्यात घ्यावे लागले. त्यामुळेच सर्वसामान्य गरिबांची मुले डॉक्टर बनू शकली. हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य होऊ शकले. 

१९६५ ते १९७६ या कालावधीत महाराष्टÑ शासनाने गोदावरी नदीवर आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण पैठणजवळ (जायकवाडी प्रकल्प) बांधण्याचे ठरवले. त्याकाळी अत्यंत कमीत कमी मोबदल्यात सरकार शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेत असे. या विरोधात कॉ. एकनाथराव भागवत यांनी लढा दिला. त्यांचा धरणाला विरोध नव्हता तर धरणाचा फायदा लाभक्षेत्राबरोबरच बुडीत क्षेत्रालाही मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी शेतकरी संघटित केले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचे मोर्चे काढले. धरणग्रस्तांना लाभक्षेत्रात जमिनी मिळाल्या पाहिजे. धरण योजनेबरोबर पुनर्वसनाची योजना तयार केली पाहिजे. तसेच पुनर्वसनाबाबत कायदा झाला पाहिजे, अशा मूलगामी स्वरुपाच्या मागण्या त्यांनी केल्या. केवळ जायकवाडी प्रकल्पाबाबतच नव्हे तर एकूणच मोठ्या धरणांबाबत सरकारचे धोरण काय असावे, या संदर्भात त्यांनी मूलभूत विचार केला होता.

लेखक -  डॉ. महेबूब सय्यद (इतिहास अभ्यासक)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत