शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांची जीभ घसरली असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या नातवाच्या (रोहित पवार) मतदारसंघात झाला आहे, असे बोलून नातवाचा मतदारसंघ ...

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या नातवाच्या (रोहित पवार) मतदारसंघात झाला आहे, असे बोलून नातवाचा मतदारसंघ हा अहिल्यादेवींपेक्षा श्रेष्ठ आहे, असेच शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. त्यांनी असे बोलणे, हा अहिल्यादेवी यांचा अपमान आहे. शरद पवार यांची जीभ घसरलीय, असेच म्हणणे योग्य ठरेल, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली आहे. जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी अनावरण झाले. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी केलेल्या भाषणाचा काही अंश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामधील वाक्य पकडत आता प्रा. शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत चौंडी (ता. जामखेड) येथे माध्यमांशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नातवाच्या प्रेमापोटी एक वक्तव्य केले. अहिल्‍यादेवींचा जन्म रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असे सांगून, नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा शरद पवार यांच्याकडून प्रयत्न झाला आहे. शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले, ते अनवधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु, अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे.