शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 17:24 IST

पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविले. त्यानंतर पवार जळगावकडे रवाना झाले.

पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तातडीने दुसरे हेलिकॉप्टर मागविले. त्यानंतर पवार जळगावकडे रवाना झाले.पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार पारनेर येथे आले होते. दुपारी २ वाजता सभा संपल्यानंतर जेवण करून पवार जळगावकडे रवाना होणार होते. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नाही, असा निरोप देण्यात आला. याची माहिती मिळताच माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करून दुसरे हेलिकॉप्टर पाठविण्याबाबत कंपनीस कळवले. यावेळी पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या हॉटेलवरच पवार यांना हेलिकॉप्टरची वाट पहात बसावे लागले. अखेर तीन वाजता दुसरे हेलिकॉप्टर आले. यानंतर पवार सव्वा तीन वाजता जळगावकडे रवाना झाले. यावेळी निलेश लंके, प्रशांत गायकवाड, सबाजी गायकवाड, बाबाजी तरटे, विक्रमसिंह कळमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAhmednagarअहमदनगर