शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शनी शिंगणापूर देवस्थान शासनाच्या ताब्यात जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:50 IST

शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे .

ठळक मुद्दे५५ वर्षांची परंपरा होणार खंडितशिर्डीच्या धर्तीवर होणार अध्यक्ष, विश्वस्तांची निवड

नेवासा : शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलतांना शिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार असल्याचे सांगितले. शिंगणापूर देवस्थान सरकारने ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकते. शिंगणापूरचा जो मूळ रहिवासी आहे तीच व्यक्ती विश्वस्त होऊ शकते, परंतु नवीन नियमानुसार राज्यातील कोणीही शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो.शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी शनी शिंगणापूर गावातील सुमारे १०४ ग्रामस्थांनी धमार्दाय आयुक्तांकडे अर्ज केले होते. त्या मुलाखती होऊन ११ ग्रामस्थांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली. १९६३ सालापासून शिंगणापूरची परंपरा या निर्णयाने धोक्यात येणार आहे. शासनाने हा निर्णय घेतल्यास गावातून विरोध होण्याची शक्यता आहे .शनी शिंगणापूर गावात अगदी राजकीय टोकाचा संघर्ष असला तरी या निर्णयाविरोधात ग्रामस्थ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कारण गावातीलच व्यक्तीला विश्वस्त होता येते अशी देवस्थानची घटना आहे. सरकारला देवस्थान ताब्यात घेण्याअगोदर विधी व न्याय खात्याकडून देवस्थानची घटना बदलून कॅबिनेटमध्ये मंजुरी घ्यावी लागेल .जगाच्या पाठीवर शनी शिंगणापूर हे आगळे वेगळे गाव असून गावातीलच विश्वस्त होतात ही ५५ वर्षांची परंपरा आहे. याला सरकारने छेद देऊ नये. असा निर्णय झाल्यास ग्रामस्थ विरोध करतील.- बाळासाहेब बानकर, सरपंच, शनी शिंगणापूरदेवस्थान शनीभक्तांच्या सुविधेसाठी कटीबद्ध असून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे सरकारच्या या निर्णयाची आम्हाला काही कल्पना नाही परंतु सरकारने गावाच्या परंपरेचा विचार करावा-अप्पासाहेब शेटे, विश्वस्त, शनेश्वर देवस्थान

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूर