शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शेख यांच्यावरही टांगती तलवार

By admin | Updated: October 27, 2016 00:48 IST

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या कारवाईस स्थगिती देणारा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळला.

अन्नधान्यासह आर्थिक मदत : सविता बेदरकर यांचा पुढाकारबोंडगावदेवी : विज्ञान युगातील आताच्या धकाधकीच्या जीवनात परमार्थ साधण्यासाठी धडपड करणारे महानुभाव सापडणे दुरापास्त झाले आहे. अशा वातावरणातही दुसऱ्यांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारे कोणी सापडले की समाजात संवेदनशिल माणसं असल्याचे समाधान मिळते. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर यांनी या गोष्टीचा प्रत्यय दिला. गोंदियापासून ८० किमी अंतरावरील बाक्टी-चान्ना येथील अनाथ झालेल्या दोन बहीण-भावांना दिवाळीच्या तोंडावर आधार देण्याचे पुण्यकर्म त्यांनी केले.या बहिण-भावाला मदत मिळावी यासाठी धडपड करीत दानदात्यांच्या मदतीने त्यांनी १ क्विंटल तांदूळ, गहू, मिरची पावडर तसेच दोघांनाही नवीन कपडे व रोख १५ हजारांची मदत मिळवून दिली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी-चान्ना येथील स्नेहा (१४) आणि विराज (८) हे दोेघेही भावंड आई-वडिलांचे छत्र एकाएकी हिरावून गेल्याने अनाथ झाले. सज्ञान होण्याआधीच आई-वडिलांची सावली हिरावलेल्या त्या अनाथ भावंडांची परिस्थिती मांडणारे वृत्त ‘लोकमत’ने २५ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित करताच अनेक लोकांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. प्रा.सविता बेदरकर, महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष प्रा.डॉ.माधुरी नासरे यांच्यासह अनेकांनी ‘लोकमत’कडे त्या अनाथ भावंडांबाबत विचारणा केली.प्रा.बेदरकर यांनी त्या भावंडांना कोणत्या प्रकारची मदत देता येईल हे जाणून घेतल्यानंतर त्यांच्यासाठी मदत गोळा केली. त्यानंतर म.रा.प्राथमिक शिक्षक समितीचे शाखा कार्याध्यक्ष कैलास हाडगे, अध्यक्ष सिध्दार्थ खोब्रागडे, शिक्षक नेते रमेश गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बडोले यांच्या उपस्थितीमध्ये अन्न-धान्य, कपडे व रोख १५ हजारांची मदत स्नेहा व विराज या भावंडाजवळ सुपूर्द केली. बाक्टी-चान्ना येथील सामान्य कुटूंबात जीवन जगणारे दिनेश भजनदास मेश्राम (५२) यांचे २ जून २०१६ रोजी उष्माघाताने निधन झाले होते. पतीच्या निधनाचा धसका घेऊन पूर्वीच प्रकृती अस्वस्थ राहात असल्याने खचलेल्या त्यांच्या पत्नी रंजना (४५) यांनीही पतीच्या मागोमाग ३ महिन्यांनी जीव सोडला. अवघ्या तीन-चार महिन्याच्या कालावधीत आई-वडिलांचे छत्र हरपल्याने दोन्ही भावंडं अनाथ झाली. स्नेहा ही मिलींद विद्यालय चान्ना बाक्टी येथे ९ व्या वर्गात तर विराज हा गावातील जि.प.प्राथ.शाळेत इयत्ता ३ मध्ये शिकत आहे. मायेची, ममतेची उब देणाऱ्या आई-वडिलांचे असे जाणे खेळण्या बागडण्याच्या वयातील त्या भावंडांसाठी मोठा आघात होता. अशात त्यांना ८० वर्षीय आजी प्रभावती भजनदास मेश्राम हिच्या आधाराने जीवन जगण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या अनाथ भावडांची माहिती सामाजिक बांधीलकी जोपासणारे जि.प.प्राथमिक शाळा बाक्टीचे सहायक शिक्षक तथा प्राथमिक शिक्षक समितीचे शाखा कार्याध्यक्ष कैलास हाडगे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ कथन केल्यामुळे २५ सप्टेंबरच्या लोकमतमध्ये बातमी प्रकाशित झाली. (वार्ताहर)- दानशुरांनी दिला मदतीचा हातबेदरकर यांनी गोंदियाचे डॉ.घनश्याम तुरकर यांच्यासह शिव नागपुरे, डॉ.माधुरी नासरे, यशोदा सोनवाने, नानन बिसेन, आरती चवारे, नीना राऊत, सीता रहांगडाले, प्राजक्ता रणदिवे, प्रा.निता खांडेकर यांच्याकडून रोख मदत तर साकेत पब्लिक स्कूलचे संचालक चेतन बजाज यांच्याकडून १ क्विंटल तांदुळ, श्रीवास यांचेकडून गहू असे साहित्य जमा केले. कैलास हाडगे यांनी त्या अनाथ भावडांना गोंदियाला नेण्यासाठी स्वत: व्यवस्था केली. सविता बेदरकर यांनी आपल्या निवासस्थानी अनाथ भावंडाकडे जमा झालेले अन्नधान्य, स्वत: घेतलेले नवीन कपडे व रोख १५ हजार रुपये त्यांच्या सुपूर्द केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील म.रा.प्राथ.शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यात मोलाचे सहकार्य केले. लोकमतच्या बातमीचा संदर्भ घेऊन गोंदियाच्या जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जि.प.प्राथ.शाळा बाक्टीला पत्र पाठवुन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्या हेतुने आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे निर्देश दिले.