शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विखेंची आमदारकीची सप्तपदी; सर्वाधिक मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:21 IST

शिर्डी मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत राधाकृष्ण विखे यांनी सातव्यांदा विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत त्यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला. 

शिर्डी विधानसभा विश्लेषण/दिलीप चोखर / प्रमोद आहेर ।  राहाता : शिर्डी मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत राधाकृष्ण विखे यांनी सातव्यांदा विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत त्यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला राम राम करीत भाजपात प्रवेश केला होता. मागील विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा आणि अभय शेळके या विरोधकांना सोबत घेतले. मताच्या बेरजेचे राजकारण व केलेल्या विकासांच्या जोरावर मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मते मिळवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चुलत बंधू सुरेश थोरात यांना विखेंविरोधात मैदानात उतरवले होते. शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील थोरात यांचे वर्चस्व होते. मात्र मतांमधून ते जाणवले नाही. साईबाबांचा आशीर्वाद आहे. दिवंगत बाळासाहेब विखे यांचे आमच्यावर उपकार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के नेतृत्व करीत असताना सामाजिक व जातीय सलोखा राखला. हा वारसा आम्ही पुढे कायम चालू ठेवल्याने जनता आमच्यासोबत आहे. महायुतीच्या परिश्रमाचा हा विजय आहे. विजय मी जनतेला समर्पित करतो. राज्यात प्रत्येक मतदारसंघात युतीच्या उमेदवांराची चांगली परिस्थिती होती, परंतु काही मतदारसंघातउमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. १२-०  बाबत त्यांनी नंतरच बोलू, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. शिर्डीत प्रथमच कमळ फुललेशिर्डी मतदारसंघातून वाढत्या मताधिक्याने सातव्यांदा आमदार होत राधाकृष्ण विखे  यांनी मतदार संघावरील आपली एकहाती सत्ता शाबूत ठेवली आहे़ विशेष म्हणजे विखेंच्या रूपाने शिर्डीत प्रथमच कमळ फुलले आहे. विखे यांनी तालुक्यात केलेली विकास कामे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील व खासदार डॉ़ सुजय विखे पाटील यांच्या रूपाने असलेले भक्कम हेल्पिंग हॅन्ड,  भाजपात गेल्यामुळे सेना-भाजपाची मिळालेली साथ, शेवटच्या घटकापर्यंत असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, जुन्या-नव्यांनी हातात हात घालून केलेले काम, सुनियोजित प्रचार यंत्रणा, तालुक्यातील कमकुवत झालेला विरोधक व विरोधात ऐनवेळी आलेला नवखा उमेदवार यामुळे विखे यांचा विजय केवळ सोपा नाही तर मतांचा डोंगर रचणारा ठरला़ विखे यांनी मंत्री पदाबरोबरच विरोधी पक्षनेते पदी असतांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या सलगीतून केलेल्या कामांनी विजय सुकर झाला़ सुरेश थोरात या नवख्या उमेदवाराला ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीने विखे यांच्या मताधिक्यात वाढ झाली़ तरीही काँग्रेसच्या व विखेंच्या परंपरागत विरोधकांनी थोरात यांच्या हाताला साथ दिल्याने त्यांनी पंचेचाळीस हजारांचा टप्पा ओलांडला़ वंचित आघाडीचे विशाल कोळगे ५७८८ मते मिळवून तिसºया क्रमांकावर राहिले तर बसपाच्या सिमोन जगताप यांना १०४३ मते मिळाली़ दीड हजाराहून अधिक नागरिकांनी नोटाचे बटन दाबून सर्वच उमेदवारांबद्दल आपली नापसंती व्यक्त केली़े 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगर