पारनेर : तालुक्यातील सुपा एमआयडीसीच्या विस्तारिकरणासाठी हंगा व सुपा येथील साडेसातशे हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचनाही जारी झाली आहे.
सुपा एमआयडीसी उभारण्यात आली. त्यावेळी हंगा, सुपा, वाघुंडे येथील जमिनी अधिग्रहित करून एमआयडीसी उभारण्यात आली. तीन-चार वर्षांपूर्वी बाबूर्डी, आपधूप, म्हसणे, पळवे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून तेथे जपानी हब उभारण्यात येत आहे. आता नव्याने हंगा व सुपा येथील साडेसातशे हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून त्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. यामुळे आता हंगा व सुपा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीत जाणार आहेत.
---
हे क्षेत्र होणार अधिग्रहित
हंगा येथील गट नंबर २३० पासून गट नंबर ५५९ पर्यंत व ७८० पर्यंत काही ठिकाणी असलेले गट व सुपा ३२०, ३२१ व ३६९ पासून ३८० पर्यंत येथील गट नंबरमधील जमिनी अधिग्रहित होणार आहेत. दोन्ही मिळून साडेसातशे हेक्टर जमीन अधिग्रहण होणार आहे.
----
हंगा, सुपा येथील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया मागील वर्षी सुरू झाली आहे. आता अधिसूचना काढण्यात आली आहे.
-सुधाकर भोसले, प्रांताधिकारी, पारनेर-श्रीगोंदा