अहमदनगर : सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत (प्राथमिक विभाग) नीता प्रकाश भाळवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ झाला. या कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, जालिंदर नरवडे महाराज, व्हाईस चेअरमन डी. आर. कुलकर्णी, सचिव ल. दि. सोनटक्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, सचिव प्र. स. ओहोळ, श्रीपाद कुलकर्णी, चेअरमन किशोर देशपांडे, शालेय समितीचे चेअरमन विकास सोनटक्के, मुख्याध्यापक दुर्योधन कासार, प्राचार्या श्रीमती संगीता जोशी, पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के, प्रभारी मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, प्रकाश भाळवणकर, नगरसेविका दीपाली बारस्कर, बाळासाहेब बारस्कर आदी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रियांका कासार, संपदा नगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती अश्विनी जाधव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दीनानाथ ढोरकुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व आभार मानले.
नीता भाळवणकर यांची सेवापूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST