लसीकरण केंद्रात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व लसीकरण केंद्रांना मुरकुटे यांनी भेटी दिल्या. लसीकरणासाठी उन्हातान्हात रांगेने उभ्या राहिलेल्या लाभार्थींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी अनेक महिला व तरुणींनी त्यांच्याकडे स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. डॉ. मुरकुटे यांनी तालुका आरोग्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना पत्र देऊन ही मागणी केली. सातत्याने पाठपुरावा केला.
आरोग्य अधिकाऱ्यांनी ही मागणी तत्त्वतः मान्य करून सर्वच लसीकरण केंद्रावर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना केंद्रचालकाला दिल्या. त्यावर अंमलबजावणी सुरू झाल्याने महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती मुरकुटे यांनी दिली.
------