शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे वृद्धांनी कोरोनाची दुसरी लाट थोपवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST

शिर्डी : कोरोनाची दुसरी लाट घराघरात पोहचली असताना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सव्वाशे वृद्धांनी मात्र परमेश्वरावरील श्रद्धा, जगण्याची उमेद व ...

शिर्डी : कोरोनाची दुसरी लाट घराघरात पोहचली असताना येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सव्वाशे वृद्धांनी मात्र परमेश्वरावरील श्रद्धा, जगण्याची उमेद व कोराना संदर्भातील घेतलेल्या काळजीने कोरोनाला आश्रमाच्या दरवाजातच रोखले आहे.

शिर्डीपासून अडीच किमी अंतरावर द्वारकामाई वृद्धाश्रम आहे.

श्रीनिवास रेड्डी व सुधा रेड्डी हे सेवाभावी दाम्पत्य दात्यांच्या मदतीतून हा आश्रम चालवते. निराधार व गरजू वृद्धांसाठी उभारलेल्या निवाऱ्यात ६० वर्षांपासून ९४ वर्षांपर्यंतचे ११७ वृद्ध आहेत. यात ७७ महिला व ५० पुरुष आहेत.

मागील वर्षी एका बेसावध क्षणी कोरोनाने आश्रमात प्रवेश केला. यावेळी श्रीनिवास रेड्डी रुग्णालयात अ‍ॅडमिट होते. सुधा रेड्डी आपल्या २५ कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सचिन तांबे यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जिवाची बाजी लावून मदतीला उभे राहिले. संवेदनशील असलेले प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के व डॉ. संजय गायकवाड तत्परतेने मदतीला धावले. डॉ. गायकवाड यांनी आपल्या टिमसह अविश्रांत मेहनत घेऊन सगळ्यांची टेस्ट केली. मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्यांना तातडीने संस्थानच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. एकूण ३७ वृद्धांना बाधा झाली. त्यातील आजार व वृद्धत्वाने जर्जर झालेल्या तिघांना कोरोना घेऊन गेला.

डॉ. संजय गायकवाड यांच्या पथकाने ८९ वृद्धांना आश्रमात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला. आधारकार्ड नसल्याने उर्वरित ३८ वृद्धांना लस देता आली नसली तरीही त्यांच्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

वृद्धांची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मशक्ती जागृत करण्यासाठी अध्यात्म व श्रद्धेचाही उपयोग होत असल्याचे द्वारकामाईचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.

............