आॅनलाईन लोकमतसंगमनेर (अहमदनगर), दि़ ५ - तालुक्यातील कोल्हेवाडी येथील महिलेचा स्वाईनफ्लूने मृत्यू झाल्याच्या घटनेला पाच ते सहा दिवस होत नाहीत तोच जाखुरी येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील मूळ रहिवाशी असलेल्या व सध्या जखुरी शिवारातील बागुल वस्ती परिसरात राहणाऱ्या आशा राजेंद्र थोरात (वय ४० ) यांना ३० मार्च रोजी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना शहरातील एका खाजगी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालल्यामुळे त्यांना तात्काळ नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्या रक्ताची खाजगी प्रयोगशाळेत तापासणी कारण्यात आली़ त्यात त्यांना स्वाईन फ्लू झाल्याची लक्षणे दिसून आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वृत्तास तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दुजोरा दिली आहे. आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपरणे उपकेंद्राचे आरोग्य सेवक एकनाथ पवार यांनी या घटनेनंतर तात्काळ जाखुरी येथील थोरात कुटुंबियांच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे़
संगमनेर तालुक्यात ‘स्वाईन फ्लू’चा दुसरा बळी
By admin | Updated: April 5, 2017 19:17 IST