शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वाईन शॉपसह २६ हॉटेलला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:29 IST

नियमभंग करून दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉप आणि हॉटेलचालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे़

अहमदनगर : नियमभंग करून दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉप आणि हॉटेलचालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे़ जिल्ह्यातील एका वाईनशॉपसह २६ हॉटेल बंद करण्याचे आदेश देत त्यांच्याकडून तीन दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे़लोकसभा निवडणूक काळात नियमबाह्य दारू विक्री होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने परवानाधारक दारुविक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आली होती़ या पथकाच्या तपासणीत २६ ठिकाणी नियमभंग झाल्याचे आढळून आले आहे़ यात दुकानाच्या बाहेरच मद्य सेवन करून देणे, परवाना नसताना दारुची विक्री, किरकोळ विक्रेत्यांना ठोक मद्य विक्री, मद्यविक्रीबाबत नोंद वही अद्ययावत न ठेवणे, निरीक्षणाच्यावेळी अभिलेख व इतर कागदपत्रे न दाखविणे, मद्याची नोंद न ठेवणे दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवणे आदी बाबी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली होती़ यामध्ये २६ परवानाधारक वगळता इतर बारा हॉटेल व वाईन शॉप विक्रेत्यांकडूनही तीन दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे़बंद करण्यात आलेल्या परवानाधारकांचा खुलासा जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे़ यावर परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते़ या संदर्भात जिल्हाधिकारी जोपर्यंत निर्णय देणार नाहीत तोपर्यंत ही दारु दुकाने बंठ ठेवण्यात येणार आहेत़जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, उपाधीक्षक सी़पी़ निकम, निरीक्षक संजय सराफ, ए़बी़ बनकर, अनिल पाटील, एस़आऱ कुसळे, डी़पी़ बगाव, एस़डी़ परदेशी, बी़ टी़ घोरतळे, जी़आऱ चांदेकर, एस़एस़ भोसले, डी़बी़ पाटील आदींच्या पथकाने या कारवाई सहभाग घेतला होता़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस