शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

स्कॉलेजिअन्स : वेगाची राणी दिव्यांगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:24 IST

अहमदनगर ऐतिहासिक शहरात क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करून उज्ज्वल भविष्य घडविण्यास सज्ज होत असणारी वेगाची राणी दिव्यांगी कृष्णा लांडे.

संदीप घावटेअहमदनगर ऐतिहासिक शहरात क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करून उज्ज्वल भविष्य घडविण्यास सज्ज होत असणारी वेगाची राणी दिव्यांगी कृष्णा लांडे. केडगाव येथील दिव्यांगी ही वयाची १२ वर्ष पूर्ण करत असताना ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरीचा धडाका लावला आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत आहे. तिच्या यशाचा हा प्रवास...अहमदनगर येथील आयकॉन शाळेत चौथीत असताना मेजर आसाराम बनसोडे यांनी दिव्यांगीबरोबर धावण्याची स्पर्धा लावली. त्यावेळी मेजर बनसोडे यांनी तिच्यातील वेगाची पारख करून वडील कृष्णा लांडे यांना प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. तिला दिनेश भालेराव यांच्याकडे प्रशिक्षणास पाठवले. त्यानंतर तिच्यातील वेगाला दिशा मिळाली.आता सध्या ती सहावी इयत्तेत उद्धव अकॅडमी इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहे. प्राचार्या निशिगंधा जाधव तिला सातत्याने प्रोत्साहन देतात. ती रोज संध्याकाळी वाडीया पार्क मैदानावर सराव करत आहे. कोच दिनेश भालेराव व राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या कल्याणकर यांचे मार्गदर्शन लाभते. सरावावर मेहनत घेत असताना कळंबोली येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर स्पर्धेतून दिव्यांगीचे मैदानी स्पर्धेत पदार्पण झाले. १०० मीटर धावणे स्पर्धेत सहभाग घेऊन चौथ्या स्थानावर तिला समाधान मानावे लागले. त्यानंतर नागपूर येथील राज्य स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातही १०० मीटर धावण्यात चौथ्या स्थानी राहिली. दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेत देखील निवड झाली.गेल्या महिन्यात रोहतक (हरियाणा)येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत तिने चौदा वर्ष वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. मुलींच्या १०० मीटर रिले स्पर्धेत तिची निवड झाली. दिव्यांगीने निवड सार्थ ठरवताना सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच तिच्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला ‘चॅम्पीयनशीप’ मिळाली. नुकत्याच डेरवण (चिपळूण) येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत १२ वर्ष वयोगटात ती सहभागी झाली होती. १०० मीटर धावणे व ३०० मीटर धावणे स्पर्धेत ती सहभागी झाली होती. या दोन्ही स्पर्धेत नवा राज्य विक्रम तिने प्रस्थापित केला. १०० मीटर तिने १३.१ सेकंद वेळ घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तसेच ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४० सेकंद वेळ नोंदवून दुहेरी सुवर्णपदक पटकावले. दिव्यांगीचे वडील देखील उत्कृष्ट कबड्डीपटू होते. तिच्या आहाराबाबत ते दक्ष असतात. दिव्यांगी ही नगरला लाभलेली कमी वयाची उत्कृष्ट खेळाडू आहे. एका वर्षभरात ती दोन राष्ट्रीय स्पर्धा व चार राज्य स्पर्धा खेळून सुवर्णपदकांची लयलूट करत आहे. क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे,शिक्षक, आई, वडील सातत्याने तिला प्रोत्साहन देतात.‘‘भविष्यात मला भारत देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धात प्रतिनिधीत्व करायचे. अहमदनगरचे नाव उज्ज्वल करायचे हे माझे स्वप्न आहे. यासाठी मला वडील तसेच मार्गदर्शक यांची मोलाची मदत मिळत आहे .’’ - दिव्यांगी लांडे -खेळाडू

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर