शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भापकरवाडी शाळेत भरते पक्षांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:03 IST

भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : भापकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांना उन्हाळ्यात अन्न, पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत ठिकठिकाणी पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भापकरवाडी शाळेत आता मुलांबरोबर पक्षांचीही शाळा भरू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थी पक्षांबरोबर शाळेचा अनोखा आनंद लुटू लागले आहेत.भापकरवाडी ही कोळगाव परिसरातील दुष्काळी पट्यातील शाळा असून ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकांनी शाळेचे रुपडेच पालटले आहे. शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे़ तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावरही विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे भापकरवाडीची शाळा फोकसमध्ये आली आहे.

शाळेत झाडांची संख्या वाढल्यामुळे शाळेमध्ये दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी थोड्या फार चिमण्या दिसायच्या. परंतु जसजशी उन्हाची तीव्रता वाढायला लागली व शिवारातील खाद्य संपल्यामुळे शाळेच्या परिसरात चिमण्यासोबतच कावळे, मैना, होला, डोमकावळे, कोतवाल, बुलबुल, फुलटोच्या, काळोखी, साळुंखी व इतर पक्षीही दिसायला लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पक्षी निरिक्षणाची संधी शाळेतच उपलब्ध झाली आहे. या पक्षांविषयी शिक्षकही विद्यार्थ्यांना माहिती सांगत आहेत.पूर्वी पक्षी शाळेत मध्यान्ह भोजन योजनेतील शिल्लक राहिलेली खिचडी खाण्यास येत असत. पण त्यांना कुत्री व मांजर यांची भीती असायची. त्यात काही पक्षी जीवानिशी जात तर काही जखमी होत असत. जखमी पक्षांवर शिक्षक-विद्यार्थी उपचार करत असत. यावर विद्यार्थ्यांनी नामी युक्ती शोधली आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी पक्षांसाठी सुरक्षित जागा शोधून तेथे अन्न व खाद्य ठेवले जात आहे. त्यामुळे रोज येथे पक्षांची शाळा भरू लागली आहे. शालेय परिसरात व बागेत भरपूर वृक्षसंपदा असल्याने पक्षी तिथेच घरटी बांधू लागली आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना पक्षांचे आवाज, रंग, आकार, त्यांच्या आवडी-निवडी यांची ओळख होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही पक्षी ओळख होत असून, पक्षांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. या संकल्पासाठी शाळेतील शिक्षक बबन बनकर, कमल ठाकर व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा