शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात भरते कावळ्यांची शाळा; कावळ्यांना खाद्य टाकणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:45 IST

श्रीगोंदा शहरातील जोधपूर मारूती चौकात दररोज पहाटे कावळ्यांची शाळा भरते. येथील एका अवलिया त्यांना दररोज सकाळी खाद्य टाकतो.

बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : शहरातील जोधपूर मारूती चौकात दररोज पहाटे कावळ्यांची शाळा भरते. येथील एका अवलिया त्यांना दररोज सकाळी खाद्य टाकतो. त्यामुळे शंभर ते दीडशे कावळे चातकासारखी कधी खाऊ मिळतो याची वाटच पाहत असतात. सकाळी सहाच्या सुमारास कैलास श्रीरंग राऊत हे कधी फरसाण, बिस्किटे, तांदूळ, तर कधी गहू, ज्वारी टाकतात. त्यांनी खाद्य टाकायला सुरुवात केली की ते खाद्य खायला कावळ्यांची नुसती झुंबड उडते, असे चित्र दररोज दिसते.कैलास राऊत यांचे वय ४५ आहे. त्यांचा दिनक्रम सुरू होतो. जोधपूर मारुती चौकात ते रोजी रोटीसाठी पान टपरीची फिरती गाडी सकाळी पाच वाजता लावतात. खराटा घेऊन आधी परिसर स्वच्छ करतात. टपरीचा माल व्यवस्थित लावायचा तोपर्यंत सहा वाजले की कावळ्यांचा एकच गलका सुरू होतो.त्यांचा हा दिनक्रम अखंडपणे गेल्या एकोणीस वर्षांपासून सुरु आहे. आजकाल या संघर्षमयी जगात माणसाचे स्वत:कडेच दुर्लक्ष होत आहे. तर हा प्राणीप्रेमी स्वत:चे मोठे कुटुंब सांभाळून या मुक्या जीवांना रोज पोटच्या पोराप्रमाणे जीव लावत आहे. रोज मांडवगण रोडला वॉकिंगला जाणारे नागरिक हे रोज कुतूहलाने पाहत असतात. कावळ्यांबरोबरच ते चिमण्या, साळुंकी, भटक्या गायींनाही चारा खाऊ घालतात. त्यांच्यासाठी त्यांनी चौकात मोठे मातीचे भांडे ठेवले आहे. त्यात नित्यनेमाने पाणी भरून मुक्या जनावरांची तृष्णाही भागवितात.मुलीमुळे पक्ष्यांचा छंद...मुक्या प्राण्यांचा जिव्हाळा कसा निर्माण झाला, याबद्दल राऊत सांगतात, चौकात पूर्वी भेळीची गाडी लावायचो. छोटी मुलगी माझ्याबरोबर यायची. ती चिमण्या, कावळे दिसले की त्यांना खाद्य टाकायची. तिच्या या सवयीने पक्षी न भीता आमच्या खांद्यावर बसायचे. आता तिचे लग्न होऊन सुखाने नांदत आहे. पण तिने लावलेला पक्ष्यांचा लळा कायम राहिला. आता न चुकता दररोज त्यांची काळजी घेतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाbirds sanctuaryपक्षी अभयारण्य