शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या सभामंडपात भरते शाळा! : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:46 IST

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक आहे.

टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी गावातील महादेव मंदिरातील सभामंडपात शिक्षणाचे धडे घेत आहेत. शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.येथे पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. विद्यार्थी संख्या १०० आहे. शाळेचे चारही वर्ग धोकादायक आहेत. ते वर्ग पाडून तेथे नवी इमारत उभारली जाणार आहे. सध्या या विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था महादेव मंदिरातील सभामंडपात केली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी पावसाच्या शिडकाव्यानंतर विद्यार्थी बसलेल्या शेडमध्ये पाणी आले होते. त्यामुळे विद्यार्थी कोरड्या जागेच्या शोधात एका कोपऱ्यात आसरा घेत होते. याबाबत ढाकणे यांनी शिक्षकांशी चर्चा केली. त्यांनी ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेविषयी चौकशी करत तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, सरपंच बुधाजी ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवळे, अंबादास राऊत आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतीने विद्यार्थांची अर्धवट व्यवस्था केली. पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. यामुळे पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने आठ दिवसांपूर्वी ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांची व्यवस्था करा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवू असा इशारा दिला होता. अखेर पर्यायी व्यवस्था न झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवली होती. त्या घटनेची दखल घेत गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे खरवंडी कासार येथे आले. त्यांनी गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे यांना विद्यार्थ्यांच्या बैठकीबाबत सूचना केल्या.याबाबत खरवंडी कासार येथील शाळा खोल्यांच्या निधीसंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांचे लक्ष वेधणार आहे, असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी