शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियमभंग करणा-या स्कूल बस होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 16:47 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीचा भंग करणा-या स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे़

अहमदनगर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीचा भंग करणा-या स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे़ येत्या आठ दिवसांत शाळेच्या गेटवर जाऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़१७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ सकाळी रस्त्यांवरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसची गर्दी दिसते़ अनेक शाळांच्या स्कूल बस या फक्त रंगरंगोटी करूनच रस्त्यावर उतरविलेल्या दिसतात़ आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून बसविलेले दिसतात़ शाळेत स्थापन केलेल्या परिवहन समितीचेही या असुरक्षित वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे़ नगर शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी खासगी रिक्षाने शाळेतून येतात़ रिक्षांना शालेय वाहतुकीचा परवाना नाही़ मात्र विद्यार्थ्यांची रिक्षातून सर्रास वाहतूक होत आहे़ उपप्रादेशिक विभागाच्या तपासणी मोहिमेत स्कूल बसला शालेय वाहतुकीचा परवाना आहे का? आसनक्षमता, अग्नीशमन यंत्रणा, स्पिड गर्व्हनर, योग्यता प्रमाणपत्र आदी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे़पालकांनी मुलांची काळजी घ्यावी : पाटीलच्पालकांनी शालेय वाहतुकीचा परवाना असणा-या वाहनातूनच आपल्या मुलांना शाळेत पाठवावे़ आपल्या मुलांची वाहतूक करणारे वाहन धोकादायक असेल तर त्यासंदर्भात शाळेतील परिवहन समितीकडे तक्रार करावी़ येत्या आठ दिवसानंतर स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे़ ज्यांनी नियमावलीची पूर्तता केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्तता करावी़ तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या रिक्षाचालकांवरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस