शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉलेजिअन्स : ब्राम्हणगावचे पोलीस उपनिरीक्षक, निलेश गंगावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:48 IST

स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते.

रोहीत टेकेकोपरगाव : स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते. त्यातून आपल्या भविष्याची हवी ती स्वप्ने निवडायची असतात. असेच काहीसे कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावच्या नंदकिशोर लक्ष्मण वाबळे व निलेश भास्करराव गंगावणे या दोन मित्रांनी आपल्या परिवारासह स्थानिक शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे जिल्ह्यात नावलौकिक देऊन युवा पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे.कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील अ‍ॅड.भास्करराव गंगावणे व आई मंदाकिनी या दाम्पत्याच्या घरी १२ फेब्रुवारी १९८८ साली निलेश यांचा जन्म झाला. अगदी बालपणापासून निलेशला खाकीचे नेहमीच आकर्षण होते. निलेश यांचे घरी आजही एकत्रित कुटुंब पद्धती बघावयास मिळते. सर्वसाधारण सुशिक्षित कुटुंब म्हणून गावात एक वेगळी ओळख आहे. वडील भास्करराव गंगावणे हे कोपरगाव येथे विधिज्ञ आहेत. आई मंदाकिनी गृहिणी आहे. दोन मोठे भाऊ पैकी एक भाऊ नितीन हे देखील विधिज्ञ आहेत तर दुसरे भाऊ शशिकांत हे एका बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. तर दोन चुलते नोकरी तर दोन चुलते शेती तर एक ठेकेदारी व्यवसाय करतात.निलेशचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर जगदंबा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात २००४ साली दहावी उतीर्ण झाला. अकरावी-बारावीचे शिक्षण कोपरगाव येथील सदगुरू गंगागीर महाविद्यालयात घेतले. पुढील अ‍ॅग्रीकल्चर विभागातील पदवीचे शिक्षण हे नाशिक येथील नामांकित महाविद्यालयात घेतले. तर मुंबई विद्यापीठातून अ‍ॅग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंटची उच्च पदवी २०१३ साली घेतली. खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन प्रवासाला सुरवात झाली.२०१४ साली मकर संक्रांतीपासून निलेशने लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच स्पर्धा परीक्षा दिली. त्यात फक्त ४ गुणावरून वनविभागाच्या ‘रेंज फॉरेस्ट आॅफिसर’ या पदाची संधी हुकली. त्यातून त्याला खूप नैराश्य आले. २०१६ साली केंद्रीय स्तरावरील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली परंतु शारीरिक चाचणी मध्ये अनफिट झाला. २०१७ साली तर केंद्रीय आणि राज्यस्तरीय पोलीस प्रशासनाच्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. परंतु पुन्हा एकदा केंद्रीय निवडीत अनफिट झाला. मात्र यावेळी निलेशने निराश न होता फिट होण्यासाठी नाशिक येथे अकादमीत जाऊ लागला व स्वत:चे तब्बल १६ किलो वजन कमी केले. २०१७ सालीच निलेशने कृषी पदवीधर मधून कृषीसहायक या पदाची देखील परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण होत निलेश आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहे. निलेश लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेईल.‘‘ माझ्या आई-वडिलांनी व संपूर्ण कुटुंबानी घेतलेले कष्ट यांची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. अनेकांनी खंबीर पाठिंबा दिल्याने यश मिळवू शकलो.’’ - निलेश गंगावणे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर