शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये पैशांचा तुटवडा

By admin | Updated: May 10, 2017 13:36 IST

शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ १० - शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातही एटीएम मशिनमधून पैसे येत नसल्याने ग्राहकांची पैशांसाठी भटकंती सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नसल्याने एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. नगर शहरातील सर्वच बँकांमध्ये ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे. बँकामध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी काही एटीएममध्येही पुरेसे पैसे उपलब्ध होते, मात्र पाहिजे तेवढी रक्कम काढता येत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.ग्रामीण भागात मात्र ग्राहकांची निराशा आहे. राहाता शहरात पाच ते सहा एटीएम आहेत. मात्र कोणत्याच मशिनमधून पैसे मिळत नाहीत. मशिनमध्ये फक्त पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने शंभराच्या पटीत पैसे काढणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विशिष्ट वेळीच मशिनमधून पैसे काढता येत असल्याची स्थिती आहे.पारनेर तालुक्यातील पळवे या गावातील ग्राहकांना महामार्गावरील सुपा येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी यावे लागते. मात्र एटीएममध्ये खडखडाट असल्याने ग्राहकांना चकरा माराव्या लागत असून ग्राहकांना ताटकळत बसावे लागते आहे. निघोज (ता. पारनेर) या गजबजलेल्या गावातील तिन्ही एटीएमवर ग्राहकांच्या रांगा होत्या. मंगळवारी एटीएममध्ये पैसे नव्हते. नोटाबंदीनंतर एटीएम बंदी झाल्याची ग्राहकांमध्ये चर्चा होती. शनिशिंगणापूरमध्ये मात्र ग्राहकांना पैसे उपलब्ध होत आहेत. तेथे बँकेपेक्षा एटीएमवरच ग्राहकांची जास्त गर्दी होती. भेंडा (ता. नेवासा) येथे एटीएममध्ये खडखडाट होता, मात्र बँकांमध्ये पैसे मिळत आहेत. जिल्हा बँकेचे एटीएम धुळखात पडून असल्याने ग्राहकांना बँकांमध्येच रांगा लावाव्या लागत आहेत.एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याच्या दोन ते तीन दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी आहेत. कोणत्याही महिन्याच्या १ ते १० या तारखेदरम्यान बँकांवर ताण असतो. बॅकांमध्ये चलन पुरवठा उपलब्ध असेल त्या पद्धतीने एटीएम मध्ये पैसे उपलब्ध करून दिले. कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढावे, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नाही. मार्केटमध्ये पुरवठा केलेला पैसा परत येत नाही. लोकांचा भर कॅशलेस पेक्षा रोख व्यवहारांवर आहे. त्यामुळे आरबीआयने चलनाचा कृत्रीम तुडवडा केल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.