शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा वाचवा ; छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक 

By शेखर पानसरे | Updated: October 4, 2022 11:46 IST

संगमनेरात आंदोलन : राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी 

संगमनेर : राज्यातील मराठी शाळा, सरकारी शाळा वाचविण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. मंगळवारी  संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतल्याने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'मराठी शाळा वाचल्या पाहिजे', 'शिक्षणाचे खासगीकरण थांबले पाहिजे', 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री' यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशीमागणी यावेळी करण्यात आली. . संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सरकारला अदानी, अंबानी यांच्या खासगी शाळा चालवायच्या, असे दिसते आहे. मराठी शाळा, सरकारी शाळा बंद करणे म्हणजे गरीब, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड चालविण्यासारखे आहे. शिक्षण खाते शाळा चालवायला आहे की, बंद करायला आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही कित्येक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे सोडून ती मुले शिक्षणातच येऊ नये म्हणून  प्रयत्न होत असून ही बाब गंभीर बाब असल्याचे घुले म्हणाले. 

कमी पटसंख्या म्हणून सरकार शाळा बंद पाडत असेल तर तेथे पटसंख्या वाढविण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले गेले का? खासगी शाळांना मान्यता द्यायची, भरमसाठ फी वाढवायची आणि मोफत शिक्षण असणाऱ्या शाळा बंद करायच्या. असे धोरण राबविले जात आहे. त्यामुळे सरकारकडूनच आता शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची ही फक्त सुरुवात आहे. हळू हळू एक-एक शाळा बंद होतील आणि लोक बघत बसतील. त्यामुळे एकही शाळा बंद पडू नये म्हणून रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करणार असल्याचेही घुले यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर