शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
2
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
3
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
4
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
5
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
6
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
7
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
8
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
9
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
10
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
11
मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
12
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
13
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
14
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
15
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
16
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
17
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
18
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
19
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
20
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 

हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:52 IST

संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. 

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन’ हे भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. संगमनेर येथील संपर्क कार्यालयातून दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही हीच भूमिका मांडली होती. पण त्यांची कृती मात्र, या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी मदत पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे कौतुक वाटले असते. पण फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांना महाराष्ट्र सरकारबरोबर बोलायचे नाही. त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करू. त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे. संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल, यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरं तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही. ती दिल्लीतल्या भाजपा नेत्यांसोबत आहे. महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल, असे थोरात यांनी म्हटले आहे.