टाकळीमिया : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या चर्चेनंतर लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य विलास पवार यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्ञानदेव निमसे होते. बाळासाहेब जाधव, भागवत नवाळे, अशोक चौधरी, रमेश आग्रे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
प्राचार्य पवार म्हणाले, लॉकडाऊननंतर महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन केले. विद्याथ्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण, मास्क पुरविण्यात आले. मुलांची सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी घेतली. त्यामुळे भीतीविना शैक्षणिक वर्ष सुरू करता येणार आहे. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविण्याची मागणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. कमल ढुस, प्रा. सुभाष शिंदे, प्रा. गोरक्षनाथ धामोरे, तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शामराव निमसे, शिवनाथ करपे, दत्तात्रय आढाव, गणेश चोथे, नितीन गोरे उपस्थित होते.
----------