पारनेर : तालुक्यात व राज्यभरात निसर्ग संवर्धन, गड दुर्गसंवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आडवाटेचं पारनेर ग्रुपने शुक्रवारी किल्ले हरिश्चंद्रगड येथे स्वच्छता मोहीम राबवली व परिसर स्वच्छ केला.
आडवाटेचं पारनेर टीम शुक्रवारी हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेले होती. यावेळी गडावरील शिवमंदिरासमोरील कुंडात खूप प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा जमा झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी कुंडात उतरून कुंडाची स्वच्छता केली. किल्ल्यावर उपस्थित राज्यभरातील पर्यटकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी टीम आडवाटेचं पारनेरचे प्रा. तुषार ठुबे, माजी सैनिक हरी व्यवहारे, सचिन गायखे, भानुदास ठाणगे, आकाश जोशी, संकेत ठाणगे, विनोद ठुबे, अजित ठाणगे, गोपाल पारधी, अक्षय पुजारी, प्रफुल्ल कार्ले, शुभम फंड, शिवाजी ठाणगे, प्रतीक शिंदे, ओम शेळके, अरुण ठुबे, वैभव पोटे, अरुण ठुबे, अक्षय सोनावळे, शेखर पानमंद, गौरव श्रीमंदीलकर आदी उपस्थित होते.
----हरिश्चंद्रगडावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. त्यांनी गडावर पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा स्वतःबरोबर नेऊन जिथे कचरा टाकण्याची व्यवस्था असेल तेथेच टाकावा. सर्वांनी असा नियम केल्यास गड परिसर स्वच्छ राहील.
-तुषार ठुबे,
सदस्य, आडवाटेचं पारनेर ग्रुप
-----
१० पारनेर १
आडवाटेचं पारनेर ग्रुपच्या वतीने हरिश्चंद्रगडावरील कुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.