शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये संघ दक्ष, भाजपचे मात्र दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:29 IST

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमध्ये अहमदनगर शहरात अनेकांना समस्या भेडसावत आहेत. महापालिका भाजपाच्या ताब्यात असुनही महापालिका प्रशासन आणि शहर भाजप मात्र जनसेवेकडे दुर्लक्षच करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र दक्षता बाळगून आम्हीही नगरकरांची सेवा करण्याची इच्छा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे व्यक्त केली.

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमध्ये अहमदनगर शहरात अनेकांना समस्या भेडसावत आहेत. महापालिका भाजपाच्या ताब्यात असुनही महापालिका प्रशासन आणि शहर भाजप मात्र जनसेवेकडे दुर्लक्षच करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र दक्षता बाळगून आम्हीही नगरकरांची सेवा करण्याची इच्छा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य करण्याची भूमिका घेत महापालिका आयुक्तांना काम करण्यास परवानगी देण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केली. विशेष म्हणजे या बैठकीला महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. संघाकडून अशी मदत कार्याची भूमिका घेतली जात असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील नेते मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाने दिलेला कार्यक्रम जिल्ह्यात राबवून त्यांनी विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच भाजपने उद्या काळे झेंडे घेऊन महाराष्ट्र बचाव आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनातही जिल्ह्यातील भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत कार्यासाठी पुढे येत असताना भाजप मात्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. संघ आणि भाजप अशी एक वेगळी भूमिका घेतली जात आहे.महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून शहरात जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असताना ही दवडली गेली आहे. जनसेवा करण्याऐवजी महापौर-उपमहापौर यांच्यात विकास कामांवरून वाद सुरू आहेत. भाजपचे शहरातील कार्यकर्तेही काम करण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे शहरात काम करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पुढाकार घेऊन काम करण्याची इच्छा प्रकट केली. ही भाजपसाठी गांधीगिरी तर नाही ना?अशी चर्चा आता शहरात रंगत आहे.