शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरचा पठारभाग सौम्य भूकंपप्रवण रेषेवर : ‘मेरी’चा दावा

By सुधीर लंके | Updated: August 26, 2018 12:52 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे धक्के हानीकारक नसल्याने नागरिकांनी घाबरु नये, असेही आवाहन या संस्थेने केले आहे.संगमनेर तालुक्यात पुण्याकडे जाताना नाशिक-पुणे महामार्गालगत डोंगराळ परिसर आहे. त्याला पठार भाग म्हणून ओळखले जाते. या भागात गत दहा दिवसात घारगाव, बोरबन, कोठे, माळेगाव पठार, आंबीखालसा, नांदूर खंदरमाळ या परिसरात जमिनीतून तीनदा मोठा आवाज होऊन नागरिकांना कंप जाणवला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता नांदूर येथे एका घराला तडे गेले आहेत. ‘लोकमत’ टीमने आज या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.गत दोन-तीन वर्षांपासून या परिसरात असे धक्के जाणवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गत आठवड्यातील दोन धक्के रात्री तर एक सकाळी जाणवला. यातील दोन धक्क्यांची ‘मेरी’या संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर २.८ व २.५ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हे भूकंपाचे धक्के असल्याचे ‘मेरी’च्या शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक नागरिकांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रात्री धक्का बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत सुटले, अशी माहिती घारगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिक भयभीत असल्याने नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, प्रशासनाकडून प्रभावी दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांनी जुन्या व मोडकळीस आलेल्या घरात राहू नये, अशा केवळ नोटिसा प्रशासनाने पाठविल्या असल्याचे खंदरमाळवाडीचे उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी सांगितले. हा भूकंपच आहे की आणखी काही याबाबतही नागरिक संभ्रमात दिसले.प्रशासनाचे दुर्लक्षशुक्रवारी रात्री नांदूर येथील सुभाष सुपेकर यांच्या घराला तडा गेला आहे. प्रशासनाला कळविल्यानंतरही शनिवारी दिवसभर कुणीही याबाबत पंचनामा करण्यासाठी आलेले नव्हते. साधे तलाठीही फिरकले नाहीत, अशी खंत या कुटुंबातील महिला अर्चना सुपेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली. या घरात वीट बांधकाम असलेल्या सिमेंटच्या भिंतीला आरपार तडा गेला आहे. इतरही काही छोट्या भेगा पडल्या आहेत.डहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषाडहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे. या रेषेवर येणारी गावे ही सौम्य भूकंपप्रवण प्रदेशात मोडतात. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसर या रेषेवर येत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. हे भूकंपाचे धक्के आहेत. मात्र, हा अत्यंत सौम्य भूकंप आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. असे धक्के काही दिवस जाणवतात व नंतर बंदही होतात. बऱ्याचदा जमिनीतील ऊर्जा बाहेर पडण्यासाठी असे धक्के मदतही करतात. त्यामुळे एकदम मोठा भूकंप होण्याची शक्यता टळते. या परिसरात १९९५, १९९८, २०११, २०१७ मध्येही असे धक्के जाणवलेले आहेत. - चारुलता चौधरी, वैज्ञानिक अधिकारी, मेरी, नाशिक.‘मेरी’ची टीम आज घारगावमध्ये‘मेरी’ (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक) ही संस्था भूकंपाबाबत अभ्यास करणारी नोडल एजन्सी आहे. या संस्थेचे पथक शनिवारी घारगाव परिसराची पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही ‘लोकमत’ला ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यायची, याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना प्रात्यक्षिक दिले जाणार असल्याचेही द्विवेदी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर