शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

संगमनेरच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार

By admin | Updated: October 12, 2016 01:04 IST

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने शहरात विविध सुविधा देण्याचे काम केले आहे. शहर व तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेने शहरात विविध सुविधा देण्याचे काम केले आहे. शहर व तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात विकासकामांचा शुभारंभ आ. थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवाचा मळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष इम्रान शेख, जावेद जहागीरदार, मुख्याधिकारी सचिन बांगर, शिवाजीराव थोरात, अनिल देशमुख, विश्वास मुर्तडक, पूनम मुंदडा, वैशाली बर्गे, नजमा मणियार, शालिनी ढोले, जुलेशा शेख, शोभा परदेशी, अल्पना तांबे, रत्नमाला लहामगे, प्रमिला अभंग, नितीन अभंग, सुमित्रा दिड्डी, गजेंद्र अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.मौलाना आझाद मंगल कार्यालय नूतनीकरण, प्रीमिअम खाते योजनेअंतर्गत विकसित स्वातंत्र्यवीर सावरकर मंगल कार्यालय नूतनीकरण, नेहरू गार्डन मत्स्यालय सुशोभीकरण, जानकीनगर रेंधे गार्डन, साकार कॉलनी खुल्या जागेत रोझ गार्डन व जॉगिंग, प्रभाग क्र १ ते ७ मधील रस्ते डांबरीकरण, ट्रिमिक्स काँक्रिटीकरण आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.आ. थोरात म्हणाले, संगमनेर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजना पूर्ण करून मोठे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे. मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांचा ओघ कायम शहराकडे असतो. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने उपक्रम राबविले आहेत. यापुढेही विकासकामे सुरूच राहतील.दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात नगरपालिकेच्या वतीने सतत विविध विकासयोजना व उपक्रम राबविले जात आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपले शहर पुढे असून, सर्व उपक्रमांमध्ये विशेष स्वच्छ व सुंदर शहर अभियानांतर्गत नागरिक व महिलांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष इम्रान शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)