मालदाड रोड परिसरात या अभियानांतर्गत विविध वृक्षांची रोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, चिंच बकुळा ,फळझाडे व फुलझाडांचा ही समावेश आहे.
नगराध्यक्ष दुर्गा तांबे, विश्वासराव मुर्तडक, बाळासाहेब पवार, सुनंदा दिघे, सोनाली शिंदे, किशोर टोकसे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सुहास आहेर, धनंजय डाके, बाबा खरात, सोमनाथ सातपुते, संतोष सातपुते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
माझी वसुंधरा या अभियानांतर्गत मालदाड रोड, घोडेकर मळा, देवाचा मळा, वेताळ बाबा मंदिर, सातपुते मळा, मालदाड रोड अशा परिसरात मोकळ्या जागेमध्ये डेरेदार व घनदाट सावली असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. साधारण दहा हजार वृक्षांची रोपण या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.
दुर्गा तांबे म्हणाल्या, ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर वृक्षारोपण व संगोपन हा एकमात्र उपाय आहे. वाढते प्रदूषण, वाढते आजार कोरोना सारखा प्रादुर्भाव हे सर्व पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे घडत आहे. म्हणून प्रत्येकाने वृक्षरोपण व संगोपन केले पाहिजे. बदलत्या जीवनशैली बरोबर स्वच्छ हवा व चांगले जीवनमान मिळण्यासाठी आरोग्यवर्धक वातावरण अत्यंत गरजेचे आहे. म्हणून यासाठी संगमनेर नगरपालिकेचे सातत्याने प्रयत्न केले असून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या जात आहेत. माझी वसुंधरा अभियानातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण व मोकळ्या जागेमध्ये घनदाट वृक्षांची रोपण करण्यात आले आहे. बाराही महिने या वृक्षांना पाणीपुरवठा करून या वृक्षांचे जतन करून घनदाट वनराई निर्माण केली जाणार आहे.
मुख्याधिकारी सचिन बांगर म्हणाले, विविध वृक्षांचे रोपण व संगोपन केले जात आहे. मात्र यामध्ये नागरिकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. वृक्ष तोडू नका. वृक्षांचे जतन करा. प्रास्ताविक श्रीनिवास पगडाल यांनी केले तर प्राध्यापक बाबा खरात यांनी वृक्षारोपणाचे विविध गीते गायले.
(२५संगमनेर)