- सुरेखा देशमुख,
सरपंच, बारागाव नांदूर
.............................
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बारागाव नांदूर लिलावाच्या चौकशीसाठी सीसीटीव्ही तपासणीचे आदेश दिले. बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात वाळू वाहतूक करणारे डंपर त्यामधील भरलेली वाळू व किती? वाळू उपसा करण्यात आला याची सविस्तर माहिती मिळावी.
- गणेश भांड,
सामाजिक कार्यकर्ते, बारागाव नांदूर
.....................
रात्रीच्या वेळेस वाळू डंपर, ट्रॅक्टर, रिक्षाच्या साह्याने वाहतूक केली जाते. मशीनच्या साह्याने वाळू उचलली जात आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. याचा तपास करून याच्यामागे नक्की कोणाचा हात आहे. हे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी शोध घेऊन कारवाई करावी. या अवैध वाळू उपशाने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे नदीची पातळी ही खोल गेली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची तीव्रता जाणू शकते.
- निर्मलाताई मालपाणी,
सरपंच, राहुरी खुर्द