शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यातील ७७ वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 17:46 IST

तालुक्यातील ५९ शाळा मधील १५३ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेकडे मागील वर्षी सादर करण्यात आला.

शेवगाव : तालुक्यातील ५९ शाळा मधील १५३ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेकडे मागील वर्षी सादर करण्यात आला. यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्याच्या निर्लेखणास मंजुरी मिळाली असून उर्वरित ३१ शाळेतील ७६ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वर्ग खोल्यांच्या नवीन बांधकामासाठी मुहूर्त मिळत नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील विविध शाळेतील तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातील नजीकच्या समाज मंदिर, अंगणवाडी इमारतीत शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ आली आहे.शेवगाव तालुक्यात२२९ प्राथमिक शाळा असुन वर्ग खोल्यांची संख्या ८५० असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ५०० पर्यत असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आली. तालुक्यातील ५९ शाळेतील १५३ वर्ग खोल्या मोडकळीस आल्या असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्या गैरसोयीच्या असल्याने वर्ग खोल्यांच्या निर्लेखणाचा प्रस्ताव मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी मिळाली असून निर्लेखणाच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आली. उर्वरित ३१ शाळेच्या ७६ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली. निर्लेखणाच्या प्रस्तावास समाविष्ट असल्यास तालुक्यातील शाळेचे वर्ग गेल्या काही दिवसापांसून गावातीलच समाजमंदिर तसेच अंगणवाडी इमारतीपैकी सोयीच्या ठिकाणी भरविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा वर्ग खोल्यांच्या निर्लेखणास मंजुरी मिळवून नवीन वर्ग खोल्याच्या बांधकामास गती मिळून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.तालुक्यातील ५९ शाळेतील १५३ वर्ग खोल्यांचा निर्लेखणाचा प्रस्ताव जिल्हा परिषदे कडे सादर करण्यात आला होता. यापैकी २९ शाळेतील ७७ वर्ग खोल्याचा निर्लेख्णाचा प्रस्ताव मंजूर झाला असून उर्वरित प्रस्तावाचा पाठ पुरावा सुरु आहे. तसेच नवीन वर्ग खोल्यांचा बांधकामास मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे गटशिक्षणाधिकारी शैलजा राउळ यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर