शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी चार बिबट्यांच्या हल्ला : दोन कालवडींचा मृत्यू, बाभळेश्वर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 18:01 IST

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन कालवडींचा मृत्यू झाला.

बाभळेश्वर : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन कालवडींचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.०६) पहाटे ही घटना घडली. एकाच वेळी चार बिबटे परिसरात वावरत असल्याच्या घटनेला वनाधिकाऱ्यांंनीही दुजोरा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.बाभळेश्वर-लोणी रस्त्यावरील असलेल्या बेंद्रे वस्तीवरील ललता बाबुराव रोहोम यांच्या शेतात गायीचा गोठा आहे. या गोठ्याला चारही बाजूने कुंपन आहे. तरीही छोट्याशा जागेतून एकाचवेळी चार बिबट्यांनी गोठ्यात प्रवेश केला. बिबट्यांनी दोन कालवडींवर हल्ला केला. दोन तास बिबट्यांचा धुमाकूळ सुरू होता. अखेर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यांनी तेथून पळ काढला.वनपरिक्षक एस. एन. जाधव, बी. एस. गाढे, बी. बी. सुरासे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी वनाधिकाऱ्यांनीही चार बिबटे असू शकतात असा दुजोरा दिला. परिसरातील बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी वनाधिकाºयांकडे केली.बिबट्यांचा कायमच संचार..लोणी, दुगार्पूर, दाढ, पाथरे या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढत आहे. पाथरे येथे दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याचा गुढरित्या मृत्यू झाला होता. आजपर्यंत अनेकांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. बिबट्याचे दर्शन तर हा या भागातील नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.बिबट्यांचा संघटीत हल्ला प्रथमच..आजपर्यंत एकाचवेळी दोन बिबट्यांनी दर्शन देणे, एका बिबट्याने हल्ला करणे, असा प्रकार घडत होते. मात्र गुरुवारी पहाटे प्रथमच एकाचवेळी चार बिबट्यांनी कालवडींवर केलेला हल्ला नागरिकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. आता बिबटेही संघटित हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता