शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

९ व १० डिसेंबरला नगरमध्ये समरसता साहित्य संमेलन ; अध्यक्षपदी गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:27 IST

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत.

अहमदनगर : समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे तर स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अशोक गांधी असल्याची माहिती सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी दिली. भटक्या विमुक्तांचे साहित्य व समरसता विषयावर संमेलनात चर्चा व परिसंवाद होणार आहे.९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष गिरीश प्रभुणे, माजी संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारसा शौर्याचा, संस्कृतीचा विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लीला गोविलकर असतील. या परिसंवादात स्वातंत्र्यचळवळ आणि भटके विमुक्तांचे योगदान विषयावर डॉ. चंद्रकांत पुरी सविस्तर माहिती देतील. तसेच नाथ संप्रदाय वा भटके विमुक्त विषयावर डॉ. एस. के. जोगी आणि भटके विमुक्तांच्या कला व जीवनवर डॉ. विजय राठोड यांचे विचार मांडतील. दुपारी सव्वा तीन वाजता मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि समरसता विषयावर डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडेल. यामध्ये डॉ. पुष्पा गावित, डॉ. शंकर धडके, डॉ. प्रकाश खांडगे सहभाग असेल. याशिवाय मराठी साहित्यातील भटके विमुक्तांचे चित्रण, भटक्यांची आत्मकथने, भटके विमुक्तांचे पारंपरिक अविष्कार याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येईल. डॉ. सुवर्णा रावळ यांचे भटके विमुक्त महिलांचे जीवन व समस्या विषयावर व्याख्यान होईल. तसेच भातू समाजाच्या कार्यकर्त्या वत्सला काळे, मुस्लिम भटके विमुक्त समाजाचे कार्यकर्ते अमीन जामगावकर यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य