शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात पोलीस बंदोबस्तात दारुची विक्री; अर्धा किलोमीटर लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:26 IST

श्रीगोंद्यात मंगळवारी (दि.५ मे) सकाळी पोलीस बंदोबस्तात सत्यम वाईन शॉप सुरु झाले. दारु खरेदीसाठी चक्क अर्धा किलोमीटरची रांग लागली होती.

श्रीगोंदा : कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. मात्र सरकारने मद्यालय सुरु केली आहेत. श्रीगोंद्यात मंगळवारी (दि.५ मे) सकाळी पोलीस बंदोबस्तात सत्यम वाईन शॉप सुरु झाले. दारु खरेदीसाठी चक्क अर्धा किलोमीटरची रांग लागली होती. पहिल्याच दिवशी दुपापर्यंत सुमारे तीन लाखांची दारुची विक्री झाल्याची माहिती समजली. तळीरामांनी दारू खरेदीसाठी गर्दी केली होती. त्याबद्दल पोलिसांच्या साक्षीने संचारबंदी नियमावलीची पायमल्ली झाली. दारूबरोबरच मटन शॉपवरही नागरिकांची गर्दी होती. रविवारपेठेतील वाईन शॉप आणि शिव भोजनालय समोरासमोर आहे. अगोदर शिवभोजनालयासमोर गर्दी असायची ती भूक भागविण्यासाठी. पण तेथे मात्र मंगळवारी गर्दी कमी होती. पण वाईन शॉपवर मात्र मद्यपींनी मोठी गर्दी केली होती.दारू विक्रीचा अजब निर्णयविद्यालय, देवालय बंद आहेत. मात्र सरकारने मद्यालय सुरू केली. एखादी माता माउली रस्त्यावर भाजी विकते. तेव्हा सरकारी अधिकारी तिची भाजी फेकून देतात. सरकार पोलीस बंदोबस्तात दारुची दुकाने सुरु करते हा अजब निर्णय आहे. याविरोधात व्यापा-यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे श्रीगोंदा तालुका व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश पोखर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाShoppingखरेदीcorona virusकोरोना वायरस बातम्या