शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

साकळाई योजनेचा सर्व्हे ८ दिवसांत होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 15:36 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाठपुरावा केला.

ठळक मुद्देदिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्याशी चर्चा

केडगाव : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाठपुरावा केला. या योजनेच्या कामाचा सर्व्हे आठ दिवसात सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली.नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांसाठी साकळाई योजना मंजूर व्हावी यासाठी कृती समिती आणि योजनेत येणा-या गावांचा लढा सुरू आहे. मागील महिन्यात दिपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रुई छत्तीशी येथे आदोंलन करण्यात आले होते. साकळाई योजनेसाठी पुढाकार घेणार असून मुख्यमंत्र्याना भेटणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र दिपाली सय्यद यांच्या आधीच डॉ. सुजय विखे व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्याना भेटून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यावेळी साकळाई कृती समितीतही फाटाफूट होत काही विखेंसोबत तर काही पाचपुते सोबत विभागले गेले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. आदेश देऊनही पुन्हा काहीच हालचाली न झाल्याने साकळाई कृती समितीने जिल्हयात तर दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिल. साकळाईचा सर्व्हे येत्या आठ दिवसात सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिल्याची माहिती दिपाली यांनी लोकमत ला दिली. याच प्रश्नासाठी मंत्री गिरीष महाजन यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी, बाबा महाराज झेंडे, भाऊसाहेब शिंदे, सोमनाथ घाडगे, बाळासाहेब नलगे, सूर्यभान कोतकर दादासाहेब जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर