शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परशाच्या मैत्रीखातर नगरची आर्ची सैराट झाली़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:08 IST

अहमदनगर: सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या कलाकाराच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पुण्याच्या एका तरूणाने नगर येथील महिलेशी मैत्री करून तिचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची एक सैराट घटना समोर आली आहे. 

अहमदनगर: सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या कलाकाराच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पुण्याच्या एका तरूणाने नगर येथील महिलेशी मैत्री करून तिचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची एक सैराट घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी  ‘त्या’ बनावट परश्याला बेड्या ठोकल्या आहेत. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय २५ रा़ मोहन नगर, मंगल आर्केड सोसायटी प्लॉट नं़७ पिंपरी जि़ पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़ चव्हाण याने वर्षभरापूर्वी फेसबुकवर अभिनेता आकाश ठोसर याच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले होते़ या अकाउंटवर नगर येथील एका २५ वर्षीय महिलेने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली़ त्यानंतर दोघांची फेसबुकवर चाटिंग सुरू झाली़ चाटिंगचे रुपांतर मैत्रित झाले़ सैराटमधील परशा आपला मित्र झालाय, या अविर्भावात  नगरची महिलाही त्याच्यासोबत चांगल्याच गप्पा मारू लागली़ डिसेंबर महिन्यात या बनावट परशाने (शिवदर्शन चव्हाण) सांगितले की, माझी आई अजारी असून तिला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे़ पैशांची खूप गरज आहे़ मला पैशांची मदत कऱ परशाचा असा निरोप येताच या महिलेने सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत. मात्र माझ्याजवळ असलेले दागिने तुला देते़ आता दागिने घेण्यासाठी महिलेसमोर गेल्यास चव्हाण याचा भंडाफोड होणार होता. त्यामुळे त्याने एक शक्ल लढविली़ त्याने नगरच्या महिलेला सांगितले की, मला आईला सोडून नगरला येता येणार नाही़ मी दागिने घेण्यासाठी माझ्या एका जवळच्या मित्राला पाठवितो़ मित्र म्हणून परशा बनलेला शिवदर्शन चव्हाण हाच नगरमध्ये आला आणि महिलेकडील पाच तोळ्याचे दागिने घेऊन गेला़ दागिने मिळाल्यानंतर चव्हाण याने त्या महिलेला फेसबुकवरून ब्लॉक करून टाकले़ त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे़, असे या महिलेच्या लक्षात आले़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरिक्षिक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, अरुण सांगळे, भगवान कोंडार, अमोल गायकवाड, वासुदेव शेलार यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीला अटक केली. त्या महिलेचे दागिनेही आरोपीकडून हस्तगत केले आहेत़