शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

साईनगरीत मंदिर रिकामे कोविड हॉस्पीटल हाऊसफुल; संस्थानसाठी कसोटीचा प्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:15 IST

 कोविड सेंटरला औषधे व स्टाफचा भयंकर तुटवडा आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असून यासाठी संगमनेहून रोज वाहतुक सुरू आहे.

प्रमोद आहेर  

शिर्डी: साईनगरीत सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे.  त्यातच प्रशासनाने  पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध न करताच गृह विलगीकरण सुविधा बंद केल्याने रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

साईबाबांच्या रूग्णसेवेचा वारसा सांगणाऱ्या साईसंस्थानसाठी हा कसोटीचा प्रसंग आहे. दर्शन व्यवस्थेसह प्रत्येक बाब दुय्यम समजुन प्राधान्याने रूग्णसेवेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक गोरगरीबांचे उपचारा अभावी जीव जातील, जे वाचतील ते कर्जबाजारी झालेले असतील. अशावेळी संस्थान व्यवस्थापन व प्रशासनाने एकदिलाने  ठाम भूमिका घेवून तातडीने उपाययोजना केल्या नाही तर ती प्रत्यक्ष साईबाबांशी व आपल्या पदाशी प्रतारणा ठरेल.

संस्थानने तातडीने दोन्ही नॉनकोवीड रूग्णालयांपैकी एक रूग्णालय बंद करून किंवा तातडीच्या सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवून तेथील स्टाफ कोवीड रूग्णालयाला पाठवणे, औषधे, मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीटसह अन्य उपकरणे खरेदीसाठी संस्थानला टेंडरची अडचण असते. प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत भाविकांना आवाहन करून या वस्तु थेट मिळवणे, नर्सिंग कॉलेजमधील ट्रेनी नर्सेसची सेवा घेणे आदी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.

 कोविड सेंटरला औषधे व स्टाफचा भयंकर तुटवडा आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असून यासाठी संगमनेहून रोज वाहतुक सुरू आहे. तेथेही ऑक्सीजन मिळवण्यासाठी वेटींग आहे. आरोग्य विभागाकडून पुरेसे डॉक्टर्स व औषधे उपलब्ध होवू शकलेली नाही. त्यातच प्रशासनाने गृह विलगीकरणाची सुविधा बंद केली आहे. डॉ. किरण गोरे सारखे या सेंटरला रोज सायंकाळी थोडावेळ सेवा देत आहेत. या डॉक्टरांनी उपचार सुचवले तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा नर्सिंग स्टाफ नाही. शिर्डी व तालुक्यात रोज सरासरी सव्वाशे ते दिडशे अधिकृत रूग्ण आढळत आहेत. प्रत्यक्षातील आकडा कितीतरी मोठा आहे.

डॉ़ प्रितम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईसंस्थान रूग्णालय-कोवीड सेंटरला सामान्य व मध्यम लक्षणे असणाºया रूग्णांसाठी २२० खाटा आहेत. अत्यवस्थ रूग्णांसाठी पन्नास आयसीयु बेडची सुविधा होती, आता ती पासष्ट करण्यात आली आहे. येथे केवळ तीन व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. बेडची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या