शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘साईकृपा’ची लिलाव प्रकिया सुरू

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

अहमदनगर : माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे़

अहमदनगर : माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे़ कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी दिली जाणार असून, कारखान्याच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखान्याची किंमत काढण्याचा आदेश श्रीगोंदा तहसीलदारांनी मंगळवारी दिला आहे़ बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे़माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले थकविली आहेत़ थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा कारखान्याचे कैलास जरे, एच़ आऱ मुंडे, चंद्रकांत गुंगे, आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर, कॉ. बाबा आरगडे, विधी सल्लागार अ‍ॅड़ कारभारी गवळी, देविदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते़ साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची ३५ कोटींची उसाची बिले थकविली आहेत़ ती मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला़ मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती़ अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत़ त्यात बँकेचीही कारखान्याकडे थकबाकी आहे़ प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावले आहे़ कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्यादेखील सूचना संबंधितांना केल्या आहेत़ किंमत निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे़ कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले़(प्रतिनिधी)साईकृपा कारखान्याची विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे़ कारखाना ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे़ ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे देण्याचे आश्वासन कवडे यांनी यावेळी दिले़