शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

दररोजच्या स्रानाने साई मूर्तीची होणार झीज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 23:39 IST

प्रमोद आहेर, शिर्डी जगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईसमाधी मंदिरातील संगमरवरी मूर्तीला आठ दिवसांनी स्नान घालावे, टॉवेलने पुसू नये

प्रमोद आहेर, शिर्डीजगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईसमाधी मंदिरातील संगमरवरी मूर्तीला आठ दिवसांनी स्नान घालावे, टॉवेलने पुसू नये, अन्यथा ही मूर्ती पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होईल, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी देवूनही संस्थानने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही़ साईसमाधीचे शताब्दी वर्ष साजरे करताना या ऐतिहासिक मूर्तीच्या जपवणुकीकडे होणारे दुर्लक्ष साईभक्तांना मानवणारे नाही़या मूर्तीचे सौंदर्य, भव्यता सुरक्षित ठेवायची असेल तर या मूर्तीला रोज स्नान घालू नये, गरम पाणी अजिबात वापरु नये, यामुळे संगमरवर ठिसूळ होतो, मूर्तीवर दही- दूध टाकू नये, त्यातील आम्लाचा मूर्तीवर परिणाम होतो़ मूर्तीच्या दाढीचे केस, हातापायांची नखे ही झिजलेली आहेत आणि हे असेच चालू राहिले तर नजीकच्या काळात ही मूर्ती पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होईल, असा इशारा या मूर्तीचे शिल्पकार बाळाजी उर्फ भाऊसाहेब तालीम यांचे वंशज हरीश तालीम यांनी १९७९ साली मूर्ती स्थापनेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दिला होता़ या मूर्तीला आठ दिवसांनी स्रान घालावे, टॉवेलने पुसू नये, त्याऐवजी कापडाने पाणी टिपावे, यामुळे ही मूर्ती आणखी काही काळ टिकेल, असा सल्लाही तालीम यांनी दिला होता़ मात्र,दुर्दैवाने साठ वर्षानंतरही संस्थानने याबाबीकडे गंभीरतेने बघितलेले नाही़ २००६ सालापर्यंत या मूर्तीला रोज गरम पाण्याच्या बादल्या व दुधाने स्रान घालण्यात येत असे़ ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधताच संस्थानने यात कपात केली़ आता रोज दोन तांबे पाण्याने स्रान घालून टॉवेलने घासून पुसण्यात येते़भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा विषय संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीसमोर मांडू.-कुंदन सोनवणे,प्रभारी कार्यकारी अधिकारी,साई संस्थान७ आॅक्टोबर १९५४ रोजी साई पुण्यतिथीला ही मूर्ती स्थापन करण्यात आली़ इटालियन कराका मार्बलची असलेली ही मूर्ती साडेपाच फूट उंच आहे़ या मूर्तीला तयार करण्यास सात महिन्यांचा कालावधी व बावीस हजार रुपये खर्च आला होता़ ही मूर्ती पिढ्यान्पिढ्या अशीच सुंदर राहावी, असे वाटत असेल तर तिला रोज स्नान घालू नये, ओल्या कापडाने हळूवार पुसावी, स्रानासाठी उत्सव मूर्ती वापरावी, असे संस्थानला अनेकदा सुचवले मात्र उपयोग झाला नाही़-सदाशिव गोरक्षकर,माजी संचालक,प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियम, मुंबई,