शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

ग्रामीण संशोधकांनी नवतंत्रज्ञान आत्मसावे

By admin | Updated: August 21, 2014 22:57 IST

लोणी येथील महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह व आव्हाने या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले.

लोणी : नव्या तंत्रज्ञानाची कास धरून ग्रामीण भागातील संशोधकांनी ते आत्मसात करण्याची ही वेळ असून, लोणी येथे होत असलेले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाच्या दृष्टीने फलदायी ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष अािण लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला. लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह व आव्हाने या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, रशिया येथील संशोधक डॉ. लिंगा किडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एम. पवार, जपान येथील संशोधक डॉ. पंकज कोणीकर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी चर्चासत्र आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली तर उपप्राचार्य प्रदिप दिघे, प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे यांनी संशोधकांचे स्वागत केले.डॉ. निमसे म्हणाले की, मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग असून, या दोन्हींची सांगड घालून ग्रामीण भागातही नवीन शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करावे. लोणी येथे होत असलेले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र हे विज्ञानाचे सामाजिक केंद्र ठरू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले की, परदेशात सुरू असलेल्या संशोधनाप्रमाणे भारतातही संशोधनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रवरानगर हे नव्या तंत्रज्ञानाच्या प्रसारात मोलाचा वाटा उचलण्यास नक्कीच पुढाकार घेईल.तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, भूशास्त्र, शेतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, संगणकशास्त्र व तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. सूत्रसंचालन प्रा. संगिता धिमते व प्रा. वैशाली मुरादे यांनी केले. प्रा. बी. जी. थोरात व उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ यांनी आभार मानले. (वार्ताहर)४५० संशोधकांचा सहभागया आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जपान, स्पेन, अमेरिका, थायलंड आदी देशातील संशोधकांसह देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ४५० संशोधक सहभागी झाले होते. तर विविध महाविद्यालयातील २०० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी या चर्चासत्रासाठी उपस्थित होत्या. सुमारे ४५० शोधनिबंधांचा अंतरभाव असलेल्या पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.