शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 17:07 IST

आरोग्य विभागाच्या सरकारी वैद्यकीय यंत्रणाच अपुरी असल्याने ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला आहे.

हेमंत आवारीअकोले : आरोग्य विभागाच्या सरकारी वैद्यकीय यंत्रणाच अपुरी असल्याने ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला आहे. अकोले, राजूर, समशेरपूर, कोतूळ या चार ग्रामीण रुग्णालयांतील मंजूर १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी चक्क १२ पदे रिक्त आहे. यामुळे तालुक्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.खाजगी सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अकोलेकरांना संगमनेर, धामणवन, नाशिक, लोणी येथील आरोग्य सुविधेवर अवलंबून रहावे लागत आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरलेले आहे. श्रेणी -२ चे मंजूर तीन पैकी दोन वैद्यकीय अधिकारी पद भरलेले आहे. अस्थायी स्वरुपाचे भरलेले एक वैद्यकीय अधिकारीपद नऊ महिन्यांनी रिक्त होणार आहे. दोन लिपिक पदे, पर्यवेक्षिका दोन पदे, स्वीपर दोन पदे, शिपाई पद व नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या कंत्राटी दोन्ही पर्यवेक्षिका पदे रिक्त आहे.जिल्ह्यात दोन कुपोषण मुक्तीसाठीचे विशेष पोषण आहार युनिट आहे. पैकी एक अकोले ग्रामीण रुग्णालयात आहे. यातील वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, स्वयंपाकी, शिपाई, पर्यवेक्षिका सर्व पदे रिक्त असून केवळ एक पर्यवेक्षिका पद भरलेले आहे. एक पर्यवेक्षिका हा कुपोषणाचा सर्व विभाग सांभाळत आहे. मध्यंतरी दोन वर्षे हे एनआरसी युनिट नगरला हलविण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी २०१६-१७ ला हे युनिट पुन्हा अकोलेला आले पण सात पदे रिक्त आहेत.समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१ वैद्यकीय अधिकारीपद रिक्त असून व श्रेणी-२ चे मंजूर तीन पैकी एक वैद्यकीय अधिकारी पद भरलेले आहे. एक बंदपत्रीत वैद्यकीय अधिकारी असून हे पद दोन महिन्यांनी रिक्त होणार आहे.राजूर ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१चे एक व श्रेणी-२चे तीन पदे मंजूर असून ही चारही पदे रिक्त आहेत. सध्या अकोलेतून दोन वैद्यकीय अधिकारी आळीपाळीने येथील आरोग्य सेवा सांभाळत आहे. हीच स्थिती कोतूळ ग्रामीण रुग्णालयाची असून चारही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. येथे जामखेडहून सेवा वर्ग असलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. एक बंदपत्रीत वैद्यकीय अधिकारीपद २० एप्रिलला रिक्त होणार आहे.रिक्तपदांमुळे तालुक्यातील चारही ग्रामीण रुग्णालायांच्या प्रशासनावर प्रंचड ताणतणाव आहे. निवडणक प्रशिक्षणासाठी एक वैद्यकीय युनिट निवडणूक प्रशासनाने मागितले होते. पण ही सुविधा आरोग्य विभाग देऊ शकले नाही. राज्यात अदमासे अडीच हजार वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असून मध्यंतरी ८९० वैद्यकीय अधिकारी भरण्यासाठीची सुरुवात झाली होती, पण प्रशासनाच घोडं कुठे आडले? हे कळले नाही.अकोले तालुक्यात ३१ पदे रिक्तअकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी मंजूर २७ पदांपैकी मवेशी, लाडगाव, देवठाण, घाटघर, शेंडी, घाटघर भरारी पथक व ब्राम्हणवाडा असे ७ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायक ३,आरोग्य सेवक ५,आरोग्य सेविका २, वाहन चालक १०, परिचर ४, प्रयोगशाळातंत्रज्ञ २, सफाई कामगार ५ असे एकूण ३१ पदे रिक्त आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर