शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा उपद्रव : भुईमुगाचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:24 IST

हवामानाच्या बदलाबरोबरच शेतकऱ्यांना रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतक री हैराण झाले आहेत.

राहुरी : हवामानाच्या बदलाबरोबरच शेतकऱ्यांना रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतक री हैराण झाले आहेत. खडांबे, सडे, वांबोरी, कुक्कडवेढे आदी गावांच्या परिसरात रानडुकरांनी हैदोस घातल्याने भूईमुगाचे क्षेत्र झपाट्याने घटले आहे.राहुरी तालुक्यात डुकरांचे कळप वाढले आहेत. शेतक-यांनी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. शेताच्या कडेला तार लावून रानडुकरांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील डुकरांचा उपद्रव थांबलेला नाही. डोक्याचे केसही शेतक-यांनी शेतात टाकून पाहिले़ तरी देखील रानडुकरांकडून नुकसान करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. एकरी २० हजार रूपये खर्च केल्यानंतर ५० हजार रूपये उत्पन्न मिळते. याशिवाय शेंगाला आलेल्या पाल्याचाही उपयोग जनावरांच्या चा-याच्या माध्यमातून होतो. ऊस, घास, मका आदी पिकांचे रानडुकरे नुकसान करीत आहेत. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. शेतमालाचा रानडुकरांपासून कसा बचाव करावा याचे मार्गदर्शन करण्याची गरज शेतक-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही शेतक-यांनी रात्र जागून काढली, मात्र रानडुकरांचा बंदोबस्त होऊ शकलेला नाही.रानडुकरांचा बंदोबस्त करावा म्हणून वन खात्याकडे शेतक-यांनी तक्रार केली होती. मात्र रानडुक्कर हे वन्य प्राणी कक्षेत येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे वन खात्याकडे दाद मागण्याचा नाद शेतक-यांनी सोडून दिला. जमिनीत तोंड खुपसून भुईमूग, चारा पिके, ऊस यांचे डुकरे नुकसान करीत आहेत. डुकरांची संख्या वाढल्याने शेतक-यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. बंदोबस्तासाठी सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. पर्यायाने पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. -विठ्ठल कारले, शेतकरी, खडांबे खुर्द, ता. राहुरी.फॉरेस्टच्या कडेला शेतक-यांची जमीन असेल तर सोलर कंपौंडसाठी अनुदान दिले जाते. रानडुकर वन कायद्यात असल्याने नुकसान भरपाई दिली जाते. सुळ्यावाले डुकरे असले तर भरपाई दिली जाते. गाव डुकरे आहेत की रानडुकरे याची पाहणी करून शहानीशा केली जाईल. -महादेव पोकळे, वनक्षेत्रपाल, राहुरी. 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी